Lokmat Sakhi >Food > द्राक्षाचे लोणचे खाऊन तर पाहा, आंबट गोड झटपट लोणचे खाऊन तोंडाला येईल चव

द्राक्षाचे लोणचे खाऊन तर पाहा, आंबट गोड झटपट लोणचे खाऊन तोंडाला येईल चव

Grapes Pickle Recipe | How to Make Grapes Pickle at Home? उन्हाळ्यात करा द्राक्षाचे लोणचे, चटपटीत रेसिपी करेल दिल खुश..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2023 12:19 PM2023-04-19T12:19:31+5:302023-04-19T12:20:09+5:30

Grapes Pickle Recipe | How to Make Grapes Pickle at Home? उन्हाळ्यात करा द्राक्षाचे लोणचे, चटपटीत रेसिपी करेल दिल खुश..

Grapes Pickle Recipe | How to Make Grapes Pickle at Home? | द्राक्षाचे लोणचे खाऊन तर पाहा, आंबट गोड झटपट लोणचे खाऊन तोंडाला येईल चव

द्राक्षाचे लोणचे खाऊन तर पाहा, आंबट गोड झटपट लोणचे खाऊन तोंडाला येईल चव

सध्या द्राक्षांचा सिझन सुरु आहे. बाजारात हिरवीगार द्राक्ष मिळत आहे. द्राक्ष खायला प्रत्येकाला आवडते. द्राक्ष दोन प्रकारचे असतात. हिरवे आणि काळे, दोन्ही प्रकारचे द्राक्ष लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडतात. पण आपण कधी द्राक्षाचं लोणचं खाल्लं आहे का? द्राक्षाचे मनुके तयार करण्यात येते, व काही ठिकाणी ज्यूस देखील बनवण्यात येते. पण आपण कदाचितच द्राक्षाचं लोणचं खाल्लं असेल.

आजपर्यंत आपण कैरी, मिरची, आवळा, गाजर, लिंबाचे लोणचे खाल्ले असेल. आता द्राक्षाचे लोणचे चाखून पाहा. द्राक्षाचे लोणचे हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आहे. अगदी कमी साहित्यात, कमी वेळात ही रेसिपी तयार होते. चवीला आंबड गोड ही रेसिपी, घरातील सदस्यांना नक्कीच आवडेल. चला तर मग या चटपटीत पदार्थाची कृती पाहूयात(Grapes Pickle Recipe | How to Make Grapes Pickle at Home?).

द्राक्षाचे लोणचे बनवण्यासाठी लागणारं साहित्य

२ कप द्राक्ष

२ टेबल स्पून आलं - हिरवी मिरची पेस्ट

अर्धा चमचा व्हाईट व्हिनेगर

बडीशेप

मेथीदाणे

डाळ तांदूळ भिजवायची गरज नाही, करा इन्स्टंट मुरमुरे इडली.. पौष्टिक पदार्थ झटपट

काळे तीळ

तिळाचे तेल

मीठ

१५ हिरव्या मिरच्या

या पद्धतीने बनवा द्राक्षाचे लोणचे

सर्वप्रथम, द्राक्षे धुवून पुसून घ्या, व त्यांचे मधोमध काप करून एका भांड्यात ठेवा. आता पॅन गरम करण्यासाठी ठेवा, त्यात तिळाचे तेल घालून गरम करा, तेल गरम झाल्यानंतर आलं - हिरवी मिरचीची पेस्ट घालून भाजून घ्या. त्यानंतर अर्धा चमचा व्हाईट व्हिनेगर घालून मिक्स करा. आता मिक्सरच्या भांड्यात बडीशेप, मेथी दाणे, काळे तीळ घालून वाटून घ्या. याला आपण लोणच्याचा मसाला देखील म्हणू शकता.

उन्हळ्यात खायलाच हवी फणसाची चमचमीत भाजी, चव अशी की येईल गावकडची आठवण

आलं - हिरवी मिरचीची पेस्टचं मिश्रण तयार झाल्यानंतर त्यात काप केलेले द्राक्ष, मधोमध काप केलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, व  लोणच्याचा तयार मसाला घालून मिश्रण मिक्स करा. अशा प्रकारे द्राक्षाचे लोणचं खाण्यासाठी रेडी. आता हे लोणचे एका हवाबंद डब्यात झाकून ठेवा. २ दिवसानंतर लोणच्याचं आस्वाद घ्या. यानंतर आपण हे लोणचे फ्रिजमध्ये ठेऊ शकता. हे लोणचे महिनाभर खाता येईल.

Web Title: Grapes Pickle Recipe | How to Make Grapes Pickle at Home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.