Lokmat Sakhi >Food > बिना कांदा लसूण आता घरीच करा हॉटेलस्टाइल भाज्या; ४ ट्रिक्स, भाज्या होतील चविष्ट

बिना कांदा लसूण आता घरीच करा हॉटेलस्टाइल भाज्या; ४ ट्रिक्स, भाज्या होतील चविष्ट

Gravy without Onion and Garlic : श्रावणात कांदा-लसूण न वापरता भाज्या चविष्ट बनवायच्या असा प्रश्न अनेकांना पडतो.  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 08:35 PM2023-08-21T20:35:49+5:302023-08-22T16:35:24+5:30

Gravy without Onion and Garlic : श्रावणात कांदा-लसूण न वापरता भाज्या चविष्ट बनवायच्या असा प्रश्न अनेकांना पडतो.  

Gravy without Onion and Garlic : Vegetable's curry without onion and garlic recipe | बिना कांदा लसूण आता घरीच करा हॉटेलस्टाइल भाज्या; ४ ट्रिक्स, भाज्या होतील चविष्ट

बिना कांदा लसूण आता घरीच करा हॉटेलस्टाइल भाज्या; ४ ट्रिक्स, भाज्या होतील चविष्ट

सध्या श्रावण (Shrawan 2023) महिना सुरू आहे. या महिन्यात अनेकजण उपवास, व्रत करतात आणि कांदा लसूण खाणं टाळतात.  कच्चा कांदा टाळतातच पण स्वयंपाकातही कांदा वापरत नाहीत. ऐरवी कांदा-लसूण शिवाय स्वयंपाक पूर्ण होत नाही. (How do you thicken gravy without onions) श्रावणात कांदा-लसूण न वापरता भाज्या चविष्ट बनवायच्या असा प्रश्न अनेकांना पडतो.  स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा वापर करून तुम्ही घट्ट, स्वादीष्ट भाजी बनवू शकता. (Gravy without Onion and Garlic)

१) ओवा आणि कढीपत्ता

जर तुम्ही बटाट्याचे सार बनवता असाल तर कढीपत्त्याचा वापर करू शकता. यामुळे भाजीला चव येते आणि सुगंध चांगला येतो. उपवासाच्या वेळेस भाजीत ओवा मिसळ्यास गॅस आणि पोटाच्या समस्या उद्भवत नाहीत. 

२) लवंग आणि दालचिनी

भाजी कोणतीही असो तुम्ही त्यात मसाला घालू शकता. यामुळे भाजीला चांगली चव येईल. तुम्ही भाजी बनवण्याआधी त्यात लवंग आणि दालचिनी घालू शकता.  फोडणीत कांदा-लसणाऐवजी तुम्ही हे २ पदार्थ वापरले तर  पदार्थाला वेगळा टेक्चर येईल.

३) जीरं, आलं आणि वेलची

जर तुम्ही कांदा आणि लसणाचा वापर करत  नसाल तर आल्याचा वापर करू शकता.  जीऱ्याबरोबर आलं वाटून तुम्ही याचा वापर स्वयंपाकात करू शकता. यामुळे फोडणी अधिक चवदार बनेल आणि सुगंध चांगला येईल. याशिवाय तुम्ही टोमॅटो मिक्सरमध्ये वाटूनही मसालेदार ग्रेव्ही बनवू शकता.

४) बिना कांदा लसणाची ग्रेव्ही  कशी बनवावी?

बिना कांदा लसणाची ग्रेव्ही बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक पॅन घ्या त्यात ६ ते ८ कापलेले टोमॅटो घाला.  त्यात काजू, खरबूजाच्या बीया, खसखस, २ चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ इंच आले आणि  अर्धा कप पाणी घाला. आता गॅसवर पॅन ठेवा, झाकण बंद करा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्या.  ५ मिनिटांनी गॅस बंद करा आणि  मग हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्याची बारीक पेस्ट बनवा.

नंतर एका पॅनमध्ये  ४ टेबलस्पून तेल घालून व्यवस्थित गरम होऊ द्या. त्यात तमाल पत्र, वेलची, लवंग आणि काळी मिरी घालून मध्यम आचेवर भाजा.  आता त्यात जीरं, हळद पावडर, कश्मिरी लाल तिखट, धणे पावडर, जीरं पावडर मंद आचेवर भाजून घ्या. मिश्रण जळू नये यासाठी थोडं पाणी घाला.

चवीनुसार मीठ, हिंग घाला. नंतर त्यात  ग्रेव्हीचे मिश्रण घालून व्यवस्थित मिक्स करा आणि झाकण बंद करून ग्रेव्ही मध्यम आचेवर  तेल सुटेपर्यंत शिजवा. ५ ते ६ मिनिटांनी त्यात कसुरी मेथी घालून व्यवस्थित मिसळा. तयार आहे बिना कांदा लसणाची ग्रेव्ही. ही ग्रेव्ही वापरून तुम्ही मटार पनीर, मशरूम, बटाटा, फ्लॉवर, सोयाबीन या भाज्या अगदी सहज बनवू शकता. 

Web Title: Gravy without Onion and Garlic : Vegetable's curry without onion and garlic recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.