Join us  

हिरव्यागार मिरच्या आणि चिंचेचे आंबटतिखट लोणचे, साऊथ इंडियन स्टाइल खास रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 7:20 PM

चटपटीत मिरची-चिंचेचे लोणचे, वाढवेल जेवणाची लज्जत....

ठळक मुद्देचटपटीत लोणचे अगदी सहज आणि काही वेळात होण्यासारखे आहेतडोसा, पोळी, भात कशाबरोबरही खाता येईल असे छान लोणचे

जेवणाची लज्जत वाढवायची तर उजव्यासोबतच डावी बाजू चांगली हवी. मुख्य जेवणाबरोबरच तोंडी लावणे प्रकार ताटात असायलाच हवेत. लोणचं असं नुसतं नाव घेतलं तरी आंबट-गोड चवीने अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. चटपटीत, झणकेदार आणि मसालेदार लोणचे असेल की कोणतीही न आवडणारी भाजीही आपण सहज खाऊ शकतो. महाराष्ट्रात लोणच्यांचे वऱ्हाडी, खान्देशी, मराठवाडी असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. इतकेच नाही तर देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्येही लोणच्याचे एकाहून एक भन्नाट प्रकार केले जातात. आपल्याला साऊथ इंडियन इडली-डोसा किंवा तांदळाचे आणि भाताचे प्रकार माहित असतात. पण साऊथ इंडीयन स्टाइलचे मिरची आणि चिंचेचे लोणचे तुम्ही कधी ट्राय केलंय? नसेल केलं तर ही घ्या मुलागई थोक्कू या लोणच्याच्या भन्नाट प्रकाराची रेसिपी...

( Image : Google)

साहित्य 

मिरच्या - पाव किलो चिंच - अर्धी वाटी गूळ - एक वाटी मीठ - चवीनुसार 

कृती 

१. लाल मिरची धुवून पुसून घ्या२. या मिरच्या मध्यभागी कापून त्याचे २ भाग करा ३. या मिरच्या कढईमध्ये बारीक गॅसवर हलक्या भाजून घ्या४. मिरच्यांमध्ये गूळ आणि चिंच घालून सगळे एकजीव करा. ५. चवीसाठी यामध्ये मीठ घाला आणि मिश्रण गार होऊद्या६. त्याची बारीक पेस्ट तयार करा आणि त्यात हिंग घाला.

( Image : Google)

विशेष सूचना 

१. मुलगाई म्हणजे साऊथ इंडियन भाषेत मिरची, लाल मिरचीला स्थानिक भाषेत मुलगाई म्हणतात. २. लाल मिरची ऐवजी हे लोणचे हिरव्या ओल्या मिरचीपासूनही करता येते. ३. या लोणच्यासाठी अगदी ठराविक पदार्थांची आवश्यकता असते, काही मिनिटांत हे लोणचे तयार होते.४. चिंचेमुळे या लोणच्याला अतिशय चांगली अशी आंबट चव येते.५. पोळी, डोसा, आमटी भात यांसारख्या पदार्थांसोबत हे लोणचं अतिशय चविष्ट लागते. ६. इतर लोणच्यांप्रमाणे पुढील काही दिवसांसाठी तुम्ही हे लोणचे साठवून ठेऊ शकता. ७. आवडत असेल तर तुम्ही या लोणच्याला तेल आणि मोहरीची फोडणीही देऊ शकता८. मिरच्या भाजण्याऐवजी तेलात थोड्या तळून घेतल्या तरी चालेल

टॅग्स :अन्नपाककृती