चवीला मस्त झणझणीत असा पदार्थ म्हणजे हिरव्या मिरचीचे लोणचे. ( green chilli pickle tastes delicious , see the recipe)भाताबरोबर पोळीबरोबर तोंडी लावायला ताटामध्ये हे लोणचे असेल तर जेवायला मस्त मज्जा येते. करायला अगदीच सोपे आहे. पाहा ही रेसिपी.
साहित्य( green chilli pickle tastes delicious , see the recipe)
हिरवी मिरची, मोहरी, मीठ, तेल, हळद, मेथीचे दाणे, जिरे, बडीशेप, लाल तिखट, लिंबू
कृती
१. तुम्हाला जेवढे तिखट झोपते त्यानुसार मिरची निवडा. कमी तिखट मिरची वापरा किंवा झणझणीत गडद हिरवी मिरची वापरा. मिरची व्यवस्थित धुऊन घ्या. एकदम कोरडी होऊ द्या. आधी फडक्याने पुसून घ्या. नंतर पंख्याखाली ठेवा पूर्ण सुकी करुन घ्या.
२. मिरचीचा आकार तुम्हाला जसा हवा तसा ठेवा. काही जणं वाटून घेतात. काही लहान गोल आकार करतात. तर काहींना फक्त मधे एक कट दिलेली मिरची आवडते. तुम्हाला जशी हवी तशी मिरची चिरून घ्या.
३. गॅसवर एक पॅन किंवा कढई गरम करत ठेवा. जरा कोमट झाल्यावर त्यामध्ये मोहरी घाला. जिरे घाला. तसेच बडीशेप घाला. थोडे मेथीचे दाणे घाला. तेल पाणी काहीही वापरु नका, मसाला सुकाच परतायचा. सतत ढवळत राहा. मसाल्यांचा खमंग वास सुटेल आणि रंग जरा बदलेल मग गॅस बंद करा आणि एका ताटामध्ये मसाला पसरवून ठेवा.
४. एका खोलगट पातेल्यामध्ये मिरचीचे तुकडे घ्या. त्यामध्ये गरजेनुसार हळद घाला. लाल तिखट घाला. तिखट रंगाचे वापरले तर उत्तम. नाही तर मिरची फारच तिखट होईल. त्यामध्ये मीठ घाला. मीठ जरा जास्त वापरले तरी चालते. लोणचे खारट लागल्यावर तेलाचा वापर करुन मीठाचे प्रमाण नीट करता येते.
५. सगळं मिक्स करा. जरा वेळ झाकून ठेवा. मसाला गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाका. मस्त बारीक वाटून घ्या. मसाल्याची छान एकजीव पूड करुन घ्या. ती पूड मिरचीच्या मिश्रणामध्ये घाला.
६. सगळं छान एकजीव करुन घ्या. सगळे मसाले एकसमान मिरचीला लाऊन घ्या. नंतर एका भांड्यामध्ये तेल गरम करुन घ्या. आणि ते गरम तेल लोणच्यावर ओता. लिंबाचा थोडा रस पिळा. जरा कोमट झाल्यावर कालवून घ्या. रात्रभरात लोणचे छान मुरेल. एका हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवा.