थंडीच्या दिवसांत आपण शक्यतो बाजारांत हिरव्यागार लसणाची ओली पात विकायला ठेवलेली पाहिली असेलच. या सिझनमध्येच विशेषतः मिळणारी ही हिरवीगार लसणाची ओली पात (Green Garlic Thecha Recipe) चवीला अतिशय छान लागते. प्रत्येक घराघरात या लसणाच्या ओल्या पातीचा (Lasun Paticha Thecha) वापर करून अनेक पदार्थ तयार केले जातात. हीच लसणाची ओली पात (Hare Lahsun Ka Thecha) वापरुन आपण त्यापासून झटपट होणारा सगळ्यांच्या आवडीचा ठेचा तयार करु शकतो. विशेष करून महाराष्ट्रीयन जेवणात 'तोंडी लावणे' हा महत्त्वाचा प्रकार असतोच(How To Make Green Garlic Thecha At Home).
आपल्याकडे जेवणाच्या ताटात वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी, चटण्या, लोणची, पापड, भजी असं काही ना काही या बाजूला असतंच. या तोंडी लावण्याच्या पदार्थांमधील एक महत्वाचा खास झणझणीत पदार्थ म्हणजे ठेचा. हिरव्यागार मिरचीचा ठेचा ही प्रत्येक महाराष्ट्रीयन कुटुंबाची पहिली पसंती आहे. याच मिरचीच्या ठेच्याप्रमाणेच आपण हिवाळ्यात येणाऱ्या हिरव्यागार लसणाच्या पातीचा झणझणीत ठेचा करु शकतो. लसणाच्या पातीचा ठेचा करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. ओल्या लसणाची पात - १ जुडी
२. तेल - १/४ कप
३. धणे - १/२ टेबलस्पून
४. जिरे - २ टेबलस्पून
५. शेंगदाणे - १/३ कप
६. हिरव्या मिरच्या - १० ते १२ (उभ्या चिरलेल्या)
७. कोथिंबीर - १/४ कप (बारीक चिरलेली)
८. मीठ - चवीनुसार
वर्षभर टिकणारं ताज्या आवळ्याचं घरच्याघरीच करा चटपटीत लोणचं, चटकदार लोणच्याची खास रेसिपी...
नेहमीचाच रवा डोसा होईल अजून क्रिस्पी - कुरकुरीत, ५ टिप्स - डोसा होईल परफेक्ट जाळीदार...
कृती :-
१. लसणाच्या पातीतील लसूण आणि हिरवीगार पात अशा दोन्ही गोष्टी वेगळ्या करुन सुरीच्या मदतीने एकदम बारीक चिरुन घ्याव्यात.
२. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात धणे, जिरे, शेंगदाणे, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि पातीचा बारीक चिरुन घेतेलेला लसूण घालावा. आता हे सगळे जिन्नस एकत्रित करून चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे. ४ ते ५ मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यावे.
३. त्यानंतर यात मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लसणाची हिरवीगार पात घालावी.
४. सगळे मिश्रण व्यवस्थित शिजवून झाल्यावर ते मिश्रण थोडे गार होऊ द्यावे. गार झाल्यावर यात चवीनुसार मीठ घाला. मिश्रण गार झाल्यावर हे मिश्रण आपल्या आवडीनुसार मिक्सरच्या भांड्यात किंवा पाटा - वरवंट्याच्या मदतीने थोडे जाडसर भरड होईल असे वाटून घ्यावे.
अशाप्रकारे थंडीच्या दिवसांत खायला चटपटीत असा हिरव्यागार लसणीच्या पातीचा मस्त झणझणीत ठेचा तयार आहे. हा ठेचा आपण भाकरी, चपाती किंवा भातासोबत तोंडी लावायला म्हणून खाऊ शकता.