तुम्ही कोथिंबीर, पुदिना, टोमॅटोची चटणी तर अनेकदा खाल्ली असेल. पण तुम्ही कधी पेरूची चटणी खाल्ली आहे का, पेरूची चटणी एक खाल्ली तर तुम्ही वारंवार ही चटणी खाल (Green Guava Chutney). या फळाची चटणी कशी बनवायची हे खूपच कमी लोकांना माहित असते. ही चटणी तुम्ही तांदूळाची भाकरी किंवा कोणत्याही भाजीबरोबर खाऊ शकता. पेरूची चटणी खाल्ल्यानं तब्येतीला काय फायदे मिळतात ते समजून घेऊ. (How To Make Rosted Guava Chutny In A Easy Way)
पेरूची चटणी खाण्याचे फायदे
पेरूच्या चटणीत व्हिटामीन सी, व्हिटामीन ए, व्हिटामीन बी असते. यात संत्र्यापेक्षा चारपट जास्त व्हिटामीन सी असते. पेरूमध्ये एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. पेरूत पोटॅशियम आणि सोडियम असते ज्यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या नियंत्रणात राहते. (Green Guava Chutney) पेरूतील फायबर्स पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतात, गॅसेसच्या त्रासापासूनही आराम मिळतो. मासिक पाळीतील वेदना कमी होण्यासही मदत होते.
पेरूची चटणी कशी करायची? (How To Make Guava Chutney)
पेरूची चटणी बनवण्यासाठी २ ते ४ हिरव्या मिरच्या उच्च आचेवर भाजून घ्या. त्यानंतर गूळ आणि बडिशेपेची पेस्ट बनवून घ्या. एका पॅनमध्ये बडीशेप भाजून त्यात थोडं पाणी घाला. त्यात थोडं शिजू द्या. नंतर पेरू शिजवून घ्या नंतर बारीक करून यात मिसळा.
यात चाट मसाला आणि शिजवलेली लाल मिरची घालून बारीक करा. धण्याची पानं बारीक करून मिसळा त्यात थोडं मीठ मिसळा आणि थोडा वेळ शिजवा नंतर गॅस बंद करा. मिक्सरमध्ये घालून वाटून घ्या नंतर एका वाटीत काढून घ्या, तयार आहे पेरूची चटणी. चटणी २ ते ५ दिवस काचेच्या भांड्यात स्टोअर करून ठेवू शकता.