Join us  

हिरव्या मुगाचे हिरवेगार धिरडे करण्याची सोपी कृती, मुलांच्या डब्यासाठी भरपूर प्रोटीन असलेला नाश्ता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2023 7:45 PM

Instant Healthy Green Moong Dal Chilla Recipe : हिरव्या मुगात भरपूर पोषण असतं आणि नाश्त्याला धिरडे करणंही सोप

रोजच्या सकाळच्या नाश्त्यासाठी नेमकं काय हेल्दी आणि चविष्ट बनवावं हा प्रश्न अनेकदा सगळ्याच गृहिणींना सतावतो. काहीवेळा आपण रोजचे उपमा, पोहे, इडली चटणी असे पदार्थ खाऊन कंटाळतो. यासोबतच आजकाल प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेताना दिसून येतो. अशावेळी सकाळच्या नाश्त्याची सुरुवात हेल्दी पदार्थ खाऊन करावी असे अनेकांना नेहमी वाटत असते. सध्या वेगवेगळ्या प्रकारचे चिला बनवण्याचा एक हेल्दी ट्रेंड आपल्याकडे अनेक लोक फॉलो करताना दिसून येतात. हिरव्या मुगाचे धिरडे हा पारंपरिक मराठ्मोठ्या थालीपिठासारखाच दिसणारा एक पौष्टिक पदार्थ आहे. 

आतापर्यंत आपण मिश्र डाळींचा, विविध भाज्यांचा वापर करून पौष्टिक धिरडे बनवले असतीलच. परंतु याचबरोबर प्रोटिन्स आणि फायबररीच असा मोड आलेल्या हिरव्या मुगाचे धिरडे हा हेल्दी ब्रेकफास्टसाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. हे मोड आलेल्या हिरव्या मुगाचे धिरडे बनवायला अतिशय सोपे व कमी साहित्यात अगदी झटपट होणारे असे आहे. हे मोड आलेल्या हिरव्या मुगाचे धिरडे आपण सकाळचा नाश्ता आणि मुलांच्या लंच बॉक्ससाठी तयार करु शकता. तर हे प्रोटीनरीच हिरव्या मुगाचे धिरडे बनवण्याची साहित्य व कृती पाहूयात(GREEN MOONG DAL CHEELA RECIPE - INDIAN VEGETARIAN BREAKFAST).     

साहित्य :- 

१. मोड आलेले मूग - १ कप २. गाजर - १ कप (किसून घेतलेले)३. पालक - १ कप (बारीक चिरून घेतलेला)४. कांदा - १ कप (बारीक चिरून घेतलेला)५. आलं - १/२ टेबलस्पून (बारीक किसून घेतलेलं)५. हिरव्या मिरच्या - १ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेल्या)६. कोथिंबीर - १ ते २ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेली)७. मीठ - चवीनुसार  ८. बेसन - १ कप ९. हळद - १ टेबलस्पून १०. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून ११. गरम मसाला - १/२ टेबलस्पून १२. पाणी - गरजेनुसार१३. तेल - ३ ते ५ टेबलस्पून 

कोथिंबीर-पुदिन्याची जुडी निवडली पण दोन दिवसात सडली तर ? ३ उपाय, पुदिना - कोथिंबीर राहील हिरवीगार...

कृती:- 

१. सर्वप्रथम मोड आलेले मूग मिक्सरला हलकेच फिरवून घ्यावेत. (त्याची जाडसर भरड करावी पेस्ट होईपर्यंत पातळ करु नये.)२. या मुगाची जाडसर भरड एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावी. ३. आता या मुगाच्या मिश्रणात किसलेलं गाजर, बारीक चिरलेला पालक, कांदा, आलं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घालून घ्यावे. हे सगळे जिन्नस चमच्याने ढवळून एकजीव करून घ्यावेत. 

तीळगुळाचे लाडू खाल्लेच असतील, आता खाऊन पाहा तीळगुळाच्या दशम्या-पावसाळ्यातला पौष्टिक आहार...

गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!

४. त्यानंतर या मिश्रणात चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट मसाला, गरम मसाला, बेसन घालून घ्यावे. ५. हे सगळे जिन्नस एकत्रित मिळून येण्यासाठी त्यात गरजेनुसार पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावे.  ६. एक पॅन मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवून द्यावा, त्यावर चारही बाजुंनी तेल सोडून घ्यावे. ७. आता चमच्याच्या मदतीने हे धिरड्याचे मिश्रण घेऊन तव्यावर घालून थालीपिठासारखे चमच्याने गोलाकार थापून घ्यावेत. ८. तव्यावर तेल सोडून धिरडे दोन्ही बाजुंनी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यावा. 

भेंडी हिरवीगार ताजी राहावी म्हणून ४ सोप्या टिप्स, फ्रिजमध्ये ठेवून भेंडी काळी पडणार नाही-सुकणार नाही...

हिरव्या मुगाचे पौष्टिक धिरडे खाण्यासाठी तयार आहे. हे धिरडे टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावेत.

टॅग्स :अन्नपाककृती