Lokmat Sakhi >Food > हिरव्या मिरचीचा ठेचा नेहमीचाच, कपभर हिरव्या मुगाचा करून पाहा झणझणीत ठेचा, तोंडी लावण्यासाठी बेस्ट

हिरव्या मिरचीचा ठेचा नेहमीचाच, कपभर हिरव्या मुगाचा करून पाहा झणझणीत ठेचा, तोंडी लावण्यासाठी बेस्ट

Green Moong Dal Maharashtrian Thecha, Spicy thecha you will loved it : हिरव्या मुगाची उसळ आपण नेहमीच करतो, आता ट्विस्ट म्हणून मुगाचा ठेचा करून पाहा; वाढेल जिभेची चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2023 10:56 AM2023-11-16T10:56:58+5:302023-11-16T10:57:37+5:30

Green Moong Dal Maharashtrian Thecha, Spicy thecha you will loved it : हिरव्या मुगाची उसळ आपण नेहमीच करतो, आता ट्विस्ट म्हणून मुगाचा ठेचा करून पाहा; वाढेल जिभेची चव

Green Moong Dal Maharashtrian Thecha, Spicy thecha you will loved it | हिरव्या मिरचीचा ठेचा नेहमीचाच, कपभर हिरव्या मुगाचा करून पाहा झणझणीत ठेचा, तोंडी लावण्यासाठी बेस्ट

हिरव्या मिरचीचा ठेचा नेहमीचाच, कपभर हिरव्या मुगाचा करून पाहा झणझणीत ठेचा, तोंडी लावण्यासाठी बेस्ट

रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला की, आपण कडधन्याच्या उसळी तयार करतो. मुग, मटकी, चणे, यासह इतर कडधान्य आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. मुगाची (Green Moong Dal) आमटी किंवा उसळ आपण खाल्लीच असेल. शिवाय काही लोकं मुगाचा डोसा, इडलीही तयार करतात. पण आपण कधी मुगाचा ठेचा करून पाहिलं आहे का? मिरचीचा झणझणीत ठेचा आपण खाल्लंच असेल, पण आता ट्विस्ट म्हणून मुगाचा ठेचा खाऊन पाहा.

हिरवे मुग खाण्याचे आरोग्यदायी फायदे अनेक आहेत. मुगात तांबे, लोह, मॅंगनीज, फॉस्फरस, कॅल्शियम आणि जस्त भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हिरवे मुग आरोग्यासाठी फायदेशीर ठरेलच (Cooking Tips), शिवाय जिभेची चव पुरवण्यासाठी फायदेशीर ठरेल(Green Moong Dal Maharashtrian Thecha, Spicy thecha you will loved it).

मुगाचा ठेचा करण्यासाठी लागणारं साहित्य

हिरवे मुग

लसूण

हिरवी मिरची

साऊथस्टाइल परफेक्ट डाळ वडा करण्याची सोपी - झटपट रेसिपी, खा पौष्टिक आणि पोटभर चविष्ट

जिरं

कोथिंबीर

मीठ

तेल

लिंबाचा रस

कृती

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात एक कप भिजवलेली हिरवे मुग घ्या. त्यात ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, एक चमचा जिरं, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून भरड वाटून घ्या. वाटताना त्यात पाणी घालू नका. तयार भरड एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर कढईत एक चमचा तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा.

कुकरमध्ये इडली किंवा खिचडी होते, दही कधी लावून पाहिलं आहे का? १ सोपी ट्रिक- दही करण्याची नवी युक्ती

तेल गरम झाल्यानंतर त्यात तयार मुगाची जाडसर भरड घालून परतवून घ्या. त्यात हलक्या हाताने पाण्याचे शिंतोडे घाला, व अर्धा चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा. तयार मुगाचा ठेचा एका बाऊलमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे झणझणीत मुगाचा ठेचा खाण्यासाठी रेडी. आपण हा ठेचा थालीपीठ, चपाती, भाकरीसोबत चवीने खाऊ शकता.

Web Title: Green Moong Dal Maharashtrian Thecha, Spicy thecha you will loved it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.