Join us  

१ वाटी हिरव्या मूगाचा करा क्रिस्पी-जाळीदार डोसा; पौष्टीक-चविष्ट डोशांचा नाश्ता बनेल झटपट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 8:14 AM

Green Moong Dal Recipes (Hirvya Mugacha Dosa Kasa Karaycha) : हा डोसा बनवण्यासाठी फार साहित्य लागत नाही अगदी ३ ते ४ पदार्थांत हा डोसा तयार होतो.

सकाळच्या नाश्त्यासाठी काही पौष्टीक झटपट तयार होईल असा पदार्थ म्हणजे मुगाचा डोसा (Moong Dosa) रात्रभर मुग पाण्यात भिजवून सकाळी तुम्ही हे डोसे बनवू शकता. (Moong dosa recipe) हिरव्या मुगाचा डोसा बनवणं खूपच सोपं आहे. खायलाही क्रिस्पी चवदार लागतो.  (How to Make Pesarattu Dosa) हा डोसा बनवण्यासाठी फार साहित्य लागत नाही अगदी ३ ते ४ पदार्थांत हा डोसा तयार होतो. (Moong Dal Dosa Recipe) मुलांना शाळेत डब्यात देण्यासाठीही हा उत्तम पर्याय आहे.

मुगाचा डोसा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते? (Green Moong Dosa Making steps)

१) भिजवलेले मुग -२५० ग्राम 

२) भिजवलेले तांदूळ - १०० ग्राम 

३) कोथिंबीर- १ वाटी  

४) आल्याचा तुकडा -१ इंच

५) कढीपत्ता- १० ते १२ पानं

६) मीठ- चवीनुसार

७) जीरं- १ टिस्पून

८) पाणी- गरजेनुसार

हिरव्या मुगाचा डोसा कसा करायचा (How to Make Moong Dosa at Home)

१) एका मोठ्या भांड्यात  मूग आणि तांदूळ एकत्र  करून ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. ५ ते ६ तास मूग भिजवून घ्या. जेणेकरून मूग फुलून तयार होतील. मूग फुलून तयार झाल्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्या. 

२) मिक्सरच्या भांड्यात तांदूळ आणि डाळ काढून बारीक दळून घ्या. त्यात कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, हिरव्या मिरच्या, जीरं आणि मीठ घालून बारीक पेस्ट तयार करू नका. ही पेस्ट जास्त  घट्ट असू नये. अन्यथा भजीच्या पीठाप्रमाणे पीठ तयार होईल. 

दिवाळीत पाहूणे घरी आले तर १० मिनिटांत करा मसाला पुलाव; सोपी रेसिपी-आवडीने खातील सगळे

३) डोश्याच्या बॅटरप्रमाणे पातळ पेस्ट तयार करून घ्या. यात तुम्ही रंग येण्यासाठी चिमुटभर हळद घालू शकता. तुम्ही यात चिमुटभर बेकींग सोडाही घालू शकता.

४) एक नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. डोशाचे बॅटर तव्यावर गोलाकार पसरवा. एका बाजूने डोसा शिजल्यानंतर  त्यात गरजेनुसार तेल घाला. 

१ वाटी ज्वारीच्या पीठाच्या करा खमंग-काटेरी चकल्या; कमी साहित्यात-झटपट बनेल परफेक्ट चकली

५) सर्व कडांच्या बाजूने चमचा फिरवून डोसा पलटी करा किंवा तुम्हाला एकाच बाजूने डोसा शिजवायचा असेल तर डोसा  कुरकुरीत झाल्यानंतर खाली काढू शकता.  खोबऱ्याची चटणी  किंवा सॉसबरोबर तुम्ही डोसा ट्राय करू शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स