वेट लॉसदरम्यान (Weight Loss) काय खावं काय प्यावं असा प्रश्न पडतो (Janhavi Kapoor). जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, आहारात हेल्दी पदार्थांचाच समावेश करा. काही लोक वेट लॉसदरम्यान, नाश्ता स्किप करतात (Food). पण नाश्ता स्किप करू नका, आपण पोहे उपमा किंवा साऊथ इंडिअन पदार्थ खाऊ शकता (Cooking Tips). जर त्याच प्रकारचा नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर, हिरव्या मुगाचा डोसा करून खा.
हिरव्या मुगाचा चिला हा प्रोटीनने परिपूर्ण असतो. हिरव्या मुगात मॅगनीज, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलेट, तांबे, जस्त आणि विविध बी व्हिटॅमिन इत्यादी पौष्टीक घटक असतात. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. अभिनेत्री जान्हवी कपूर देखील वेट लॉससाठी हिरव्या मुगाचा चिला खाते. पण हा डोसा कसा करायचा? पाहा(Green Moong Dosa | Recipes Under 15 Minutes | Janhavi Kapoor Favourite Breakfast).
इडली फुलत नाही? कडक होते? कपभर रव्याची करा स्पॉन्जी इडली; नुसता रव्याचा लगदा होणे टळेल
हिरव्या मुगाचा चिला करण्यासाठी लागणारं साहित्य
हिरवे मूग
पाणी
पालक
आलं
जिरं
मीठ
कृती
सर्वात आधी एका बाऊलमध्ये एक कप हिरवे मूग घ्या. त्यात पाणी घालून अख्खे मूग धुवून घ्या. नंतर त्यात पुन्हा एक कप पाणी घालून भिजत ठेवा. आता एका मिक्सरच्या भांड्यात भिजेलेले हिरवे मूग, पालक, एक इंच आलं, एक चमचा जिरं घालून पेस्ट तयार करा.
गव्हाच्या पिठात मिसळा १ खास पीठ; शुगरही वाढणार नाही आणि वजनही होईल कमी आणि..
तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात एक कप पाणी आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्याला ब्रशने तेल लावा. मग त्यात चमचाभर बॅटर ओतून पसरवा, व दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे हिरव्या मुगाचा पौष्टीक डोसा खाण्यासाठी रेडी.