Join us

थेंबभर तेलाचा वापर न करता करा हिरव्या मुगाचा वेट लॉस डोसा; कुरकुरीत डोसा १० मिनिटांत रेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2024 18:26 IST

Green Moong Sprouts Dosa - Healthy Breakfast Weight Loss Dosa : ना आंबवणे - ना भिजत घालणे; हिरव्या मुगाचा क्रिस्पी डोसा कसा करायचा पाहा..

सकाळच्या नाश्त्याला हेल्दी पदार्थ (Healthy Nashta Recipe) खायला हवे. यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते (Energetic). यासह वेट लॉससाठीही मदत होते. नाश्त्याला आपण पोहे, उपमा किंवा साऊथ इंडिअन पदार्थ (South Indian Food) खातो. ज्यात इडली, डोसा (Weight Loss Dosa) हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. यामुळे शरीराला पौष्टीक घटक मिळतात (Healthy Food). यासह वेट लॉससाठीही मदत होते. अनेकदा डोसा खाण्याची इच्छा होते. पण डाळ - तांदूळ भिजत न घातल्यामुळे आपण डोसे करणं टाळतो.

जर आपल्याला झटपट डोसे करायचे असतील तर, आपण हिरव्या मुगाचेही डोसे करू शकतो. हिरव्या मुगामध्ये अनेक पौष्टीक गुणधर्म असतात. हिरवे मूग हे प्रोटीनचे उत्तम स्त्रोत आहे. वेट लॉससाठी हा नाश्ता बेस्ट आहे. पण हिरव्या मुगाचा डोसा करताना गडबड होते. कधी डोसा फाटतो, क्रिस्पी होत नाही. हिरव्या मुगाचा डोसा नेमका कसा करायचा? पाहा(Green Moong Sprouts Dosa - Healthy Breakfast Weight Loss Dosa).

हिरव्या मुगाचा कुरकुरीत डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य

हिरवे मूग

टोमॅटो

हिरवी मिरची

कांदा

कोथिंबीर

मीठ

बेकिंग सोडा

फ्लॉवरमधील कीड - अळ्या निघतील चटकन; कोमट पाण्यात घाला १ पिवळा मसाला; चटकन अळ्या बाहेर

पाणी

कृती

सर्वात आधी मिक्सरचं भांडं घ्या. त्यात भिजेलेल हिरवे मूग घाला. त्यात भिजलेले हिरवे मूग वाटून घ्या. पेस्ट करताना त्यात जास्त पाणी घालू नका. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या.

नंतर त्यात अर्धा कप पाणी, मीठ, बेकिंग सोडा घालून चमच्याने मिक्स करा. आता कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर चिरून घ्या. दुसरीकडे पॅन गरम करण्यासाठी ठेवा. नॉन - स्टिक तवा असेल तर, तेलाचा वापर नाही केला तरी चालेल.

वाटीभर मेथी दाण्यांचे करा पौष्टीक लाडू, कडू अजिबात होणार नाही; हिवाळ्यात दुखण्यांपासून राहाल लांब

पॅन गरम झाल्यानंतर त्यात चमाचाभर बॅटर ओता. आणि पसरवा. डोश्यावर चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर पसरवा. हवं असल्यास आपण आवडीचे भाज्याही पसरवू शकता. आता चमच्याने उलथून दोन्ही बाजूने डोसा भाजून घ्या. अशा प्रकारे हिरव्या मुगाचा कुरकुरीत डोसा खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.