Lokmat Sakhi >Food > हिरवी मुगडाळ डोसा, हिरव्यागार पौष्टिक डोशाची घ्या चविष्ट रेसिपी, प्रोटीन डाएट - शाळेच्या डब्यासाठी उत्तम

हिरवी मुगडाळ डोसा, हिरव्यागार पौष्टिक डोशाची घ्या चविष्ट रेसिपी, प्रोटीन डाएट - शाळेच्या डब्यासाठी उत्तम

Green Moong Dal Dosa मोड आलेल्या मुगापासून अनेक पदार्थ बनवले जातात. नाश्त्यासाठी ट्राय करा ग्रीन डोसा, चवीला उत्तम उत्कृष्ट लागते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2023 12:53 PM2023-01-10T12:53:34+5:302023-01-10T12:56:04+5:30

Green Moong Dal Dosa मोड आलेल्या मुगापासून अनेक पदार्थ बनवले जातात. नाश्त्यासाठी ट्राय करा ग्रीन डोसा, चवीला उत्तम उत्कृष्ट लागते..

Green Mugdal Dosa Get Tasty Green Nutritious Dosa Recipe, Protein Diet - Perfect for School Canteen | हिरवी मुगडाळ डोसा, हिरव्यागार पौष्टिक डोशाची घ्या चविष्ट रेसिपी, प्रोटीन डाएट - शाळेच्या डब्यासाठी उत्तम

हिरवी मुगडाळ डोसा, हिरव्यागार पौष्टिक डोशाची घ्या चविष्ट रेसिपी, प्रोटीन डाएट - शाळेच्या डब्यासाठी उत्तम

हिरवी  मुगाची डाळ आपल्या शरीरासाठी अनेक पौष्टीक घटक देतात. याला पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलेट, तांबे, जस्त आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादी शरीराला आवश्यक असणारे घटक यात आढळतात. हिरव्या मुगाच्या डाळीपासून आपण अनेक पदार्थ बनवू शकता. आपण जर डाएटवर असाल अथवा प्रोटीनयुक्त पदार्थांचा सेवन करत असाल तर हिरव्या मुगाच्या डाळीचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. हिरव्या मुगाच्या डाळीपासून आपण डोसा देखील बनवू शकता. तांदळापासून तयार डोसा आपण अनेकदा खाल्ला असेल. हिरव्या मुगाच्या डाळीपासून तयार ही रेसिपी चविला उत्तम आणि उत्कृष्ट लागते. चला तर मग या पदार्थाची कृती जाणून घेऊया.

हिरव्या मुगाचा डोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य

हिरवे मुग

आलं

हिरवी मिरची

मीठ

कोथिंबीर

पाणी

बारीक चिरलेला टोमॅटो

बारीक चिरलेला कांदा

तुप अथवा तेल

कृती

सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले मोड आलेले हिरवे मुग घ्या. त्यात आल्याचे तुकडे, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि पाणी घालून मिश्रण बारीक करून घ्या. मिश्रण जास्त पातळ अथवा जाडसर ठेवायचे नाही आहे. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले तसेच ठेवावे.

मिश्रण बारीक केल्यानंतर एका भांड्यात काढून घ्या. दुसरीकडे नॉन स्टिक तवा गरम करा त्यावर तूप अथवा तेल पसरवा, आणि तयार मिश्रण डोसाप्रमाणे पसरवा. शेवटी कांदा आणि टोमॅटोचे काप पसरवा, अशाप्रकारे सगळ्या पीठाचे डोसे तयार करून घ्या.

आपण हा ग्रीन डोसा हिरवी चटणी अथवा नारळाच्या चटणीसह खाऊ शकता. ही झटपट रेसिपी सकाळच्या किंवा सायंकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम ठरेल.

Web Title: Green Mugdal Dosa Get Tasty Green Nutritious Dosa Recipe, Protein Diet - Perfect for School Canteen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.