Lokmat Sakhi >Food > चमचमीत हिरवीगार पावभाजी कधी खाल्ली आहे? लालेलाल पावभाजी विसराल ‘अशी’ करा पौष्टिक ग्रीन पावभाजी...

चमचमीत हिरवीगार पावभाजी कधी खाल्ली आहे? लालेलाल पावभाजी विसराल ‘अशी’ करा पौष्टिक ग्रीन पावभाजी...

Green Pav Bhaji Recipe : हिरव्या भाज्या वापरुन आपण सुंदर पाैष्टिक ग्रीन पावभाजी करु शकतो, चमचमीत आणि हेल्दी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2024 03:58 PM2024-07-22T15:58:07+5:302024-07-22T16:07:06+5:30

Green Pav Bhaji Recipe : हिरव्या भाज्या वापरुन आपण सुंदर पाैष्टिक ग्रीन पावभाजी करु शकतो, चमचमीत आणि हेल्दी...

Green Pav Bhaji Recipe Green Pav Bhaji Recipe Healthy Street Style Taste | चमचमीत हिरवीगार पावभाजी कधी खाल्ली आहे? लालेलाल पावभाजी विसराल ‘अशी’ करा पौष्टिक ग्रीन पावभाजी...

चमचमीत हिरवीगार पावभाजी कधी खाल्ली आहे? लालेलाल पावभाजी विसराल ‘अशी’ करा पौष्टिक ग्रीन पावभाजी...

पाव भाजी म्हटलं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. गरमागरम पावभाजी खायला खूपच टेस्टी लागते. मुंबईतील रस्त्यांवर गाडीवर मोठा तवा ठेवून त्यावर लालचुटुक रंगांची, मखमली बटरमध्ये घोळवून घेतलेली ही भाजी यासोबतच गरम तव्यावर बटरमध्ये घोळवलेले पाव. या पाव भाजीच्या सुगंधाने पोट भरलेले असले तरीही परत भूक लागते आणि पावभाजी खाण्याचा मोह आवरता येत नाही(Green Pav Bhaji).

कधी जेवणाला, कधी भूक लागली म्हणून, पार्टीसाठी, अचानक पाहुणे आले असता तुम्ही नक्कीच पावभाजीचा बेत करु शकता. आजकाल आपल्याला बाजारांत पाव भाजीचे विविध प्रकार खायला मिळतात. शक्यतो पाव भाजी (Green Pav Bhaji Recipe Healthy Street Style Taste) म्हटलं तर आपल्या डोळ्यांसमोर येते ती लालचुटुक पाव भाजी. या पावभाजीत आपण भरपूर तेल, बटर घालून ती चविष्ट बनवतो खरे पण या अतिरिक्त तेलामुळे ही पावभाजी अनहेल्दी होते. यासाठीच आपण काही हिरव्या भाज्यांचा वापर करून हेल्दी पावभाजी बनवू शकतो. ही हिरवी हेल्दी पावभाजी बनवण्याची रेसिपी पाहूयात(Green Pav Bhaji Recipe).

साहित्य :- 

१. मटार - १ कप 
२. कोबी - १ कप (बारीक चिरलेला)
३. फ्लॉवर - १ कप 
४. दुधी - १ कप (बारीक चिरलेला)
५. फरसबी - १ कप 
६. लसूण - ८ ते १० पाकळ्या 
७. आलं - २ टेबलस्पून (बारीक किसलेल)
८. हिरव्या मिरच्या - ४ ते ६
९. कांदा - १ कप 
१०. कांद्याची पात - १ कप 
११. ढोबळी मिरची - १/२ कप 
१२. बटाटा - १ कप 
१३. हिरवे मूग - १ कप (उकडवून घेतलेले) 
१४. धणेपूड - १ टेबलस्पून 
१५. जिरेपूड - १ टेबलस्पून 
१६. पाव भाजी मसाला - २ टेबलस्पून 
१७. आमचूर पावडर - १ टेबलस्पून 
१८. पालक प्युरी - १/४ कप 
१९. बटर - गरजेनुसार 

पावसाळ्यात भाज्या नीट धुतल्या  नाहीतर पडाल आजारी, भाज्या धुण्याची सोपी पद्धत... 

हा घ्या ताकदीचा सुपरडोस; १५ मिनिटांत करा मखाण्याचा उत्तपा- नाश्ता हेल्दी, पुरेल दिवसभर एनर्जी...

कृती :- 

१. कुकरमध्ये मटार,कोबी, फ्लॉवर, दुधी, फरसबीसगळे जिन्नस बारीक तुकडे करून थोडे पाणी घालून उकडवून घ्यावेत. हे मिश्रण हलकेच मॅश करुन घ्यावे.  
२. एका कढईत तेल घेऊन त्यात बारीक किसून घेतलेलं आलं, लसूण, हिरव्या मिरच्या घालाव्यात. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, पातीचा कांदा घालावा. 
३. आता यात कांद्याची पात, ढोबळी मिरची बारीक चिरुन घालावेत. त्यानंतर यात उकडवून घेतलेले हिरवे मूग व मॅश केलेला बटाटा घालावा. 

४. त्यानंतर या मिश्रणात धणेपूड, जिरेपूड, पाव भाजी मसाला, आमचूर पावडर, पालक प्युरी घालावी. 
५. आता सगळ्यात शेवटी या मिश्रणात कुकरमध्ये उकडवून मॅश करुन घेतलेल्या भाज्या घालाव्यात. 
६. ही भाजी १० ते १५ मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यावी. 
७. सगळ्यांत शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बटर घालूंन पाव भाजी खाण्यासाठी सर्व्ह करावी. 

अशाप्रकारे गरमागरम हेल्दी पावभाजी खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: Green Pav Bhaji Recipe Green Pav Bhaji Recipe Healthy Street Style Taste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.