Join us  

तोंडी लावण्यासाठी करा हिरव्या टोमॅटोची चटणी; आंबट-गोड चवीची चटणी एकदा खाल तर भूक खवळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2024 12:24 PM

Green Tomato Chutney Recipe : हिरव्या टोमॅटोची चटकदार चटणी कशी करायची?

लाल रसरशीत टोमॅटोचा वापर आपण बऱ्याच भाज्यांमध्ये करतो. शिवाय टोमॅटोची चटणी, भाजी आणि डाळीमध्ये देखील आपण टोमॅटोचा वापर करतो. पदार्थात टोमॅटो घालताच चवीमध्ये वेगळेपणा येतो. ज्यामुळे पदार्थ चटकदार आणि चविष्ट लागते. पण आपण कधी हिरव्या टोमॅटोची चटणी खाऊन पाहिली आहे का? हिरव्या टोमॅटो खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

हिरव्या टोमॅटोमध्ये जीवनसत्त्वे, अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रथिने, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात (Cooking Tips). काही लोकं आंबट म्हणून हिरवे टोमॅटो खाणं टाळतात (Tomato Chutney). पण आपण त्यांच्यासाठी खास हिरव्या टोमॅटोची चटणी तयार करून देऊ शकता. रोजची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर, एकदा हिरव्या टोमॅटोची चटणी करून खा(Green Tomato Chutney Recipe).

हिरव्या टोमॅटोची चटणी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

टोमॅटो

तेल

शेंगदाणे

हिरव्या मिरच्या

लसणाच्या पाकळ्या

कपभर बदामाची करा पौष्टीक वडी; बुद्धी होईल तीक्ष्ण-आरोग्य राहील सुदृढ; मिळतील फायदेच-फायदे..

कोथिंबीर

हिरवे टोमॅटो

जिरे

मीठ

पांढरे तीळ

मोहरी

कडीपत्ता

कृती

सर्वप्रथम, टोमॅटो चिरून घ्या. एका कढईत २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात वाटीभर शेंगदाणे, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, हिरवे टोमॅटो, २ चमचे जिरे आणि चवीनुसार मीठ घालून साहित्य भाजून घ्या.

ना ब्रेड-ना चटणी; हाय प्रोटीन नो ब्रेड सँडविचची सोपी कृती; पोट भरेल गच्च-वेट लॉससाठी उत्तम

साहित्य भाजून घेतल्यानंतर त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा. जेणेकरून वाफेवर टोमॅटो शिजेल. नंतर त्यात एक चमचा पांढरे तीळ घालून भाजून घ्या. भाजलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या, व त्याची चटणी तयार करा. चटणी तयार करताना त्यात पाणी घालू नका.

तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. फोडणीच्या पळीत २ चमचे तेल घाला. नंतर त्यात अर्धा चमचा मोहरी, चिमुटभर हिंग, कडीपत्ता घालून मिक्स करा. तयार फोडणी चटणीवर ओतून मिक्स करा. अशा प्रकारे हिरव्या टोमॅटोची चटकदार चटणी खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स