Join us  

कोबीची भाजी आवडत नाही? करा हॉटेलस्टाईल परफेक्ट कॅबेज सॅलेड, कुणाल कपूर सांगतात हटके रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2023 12:10 PM

Grilled Cabbage Salad By Chef Kunal Kapoor : मधल्या वेळेला खाता येईल अशी हटके रेसिपी...

कोबीची भाजी म्हटलं की आपल्याला अजिबात नको वाटतं. अनेकांना कोबीला येणारा उग्र वास आणि या भाजीची चवही आवडत नाही. तर काहींना कोबीमुळे गॅसेसचा त्रास होतो, त्यामुळे कोबी खाणे टाळले जाते. मात्र सतत वेगळी भाजी आणि सॅलेड काय करायचे असा प्रश्न तमाम महिला वर्गासमोर असतो. अशावेळी कोबीचेच थोडे हटके सॅलेड केले तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच ते अतिशय आवडीने खातील. प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यासाठी कोबीच्या हटके हॉटेलस्टाईल सॅलेडची रेसिपी सांगतात. पाहूयात झटपट होणारी ही चविष्ट रेसिपी नेमकी कशी करायची (Grilled Cabbage Salad By Chef Kunal Kapoor). 

साहित्य - 

१. कोबी - १ गड्डा

२. मीठ - अर्धा चमचा 

३. मिरपूड - अर्धा चमचा 

(Image : Google)

४. बटर - ३ चमचे

५. आल- १ चमचा 

६. लसूण - १ चमचा 

७. हिरवी मिरची - अर्धा चमचा

८. दाणे - २ चमचे

९. तीळ - अर्धा चमचा 

१०. सोया सॉस - १ चमचा 

११. लिंबू - अर्धे

१२. मध - १ चमचा 

१३. कोथिंबीर - अर्धी वाटी 

१४. कांद्याची पात - अर्धी वाटी 

१५. चिली फ्लेक्स - १ चमचा 

कृती -

१. कोबी स्वच्छ धुवून त्याचे ४ भाग करावेत.

२. त्यावर मीठ आणि मिरपूड भुरभुरायची.

३. पॅनमध्ये बटर घालून त्यावर हे कोबीचे तुकडे सगळ्या बाजुने चांगले खरपूस भाजून घ्यायचे. 

४. मग हे तुकडे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे.

५. त्याच पॅनमध्ये बारीक केलेलं आलं, लसूण आणि मिरचीचे काप घालून चांगले परतून घ्यायचे.

६. त्यामध्ये अर्धवट बारीक केलेले दाणे, तीळ आणि सोया सॉस घालायचा.

७. यामध्ये लिंबाचा रस पिळायचा आणि मध घालायचा.

८. हे मिश्रण चांगले एकजीव करुन यामध्ये थोडे पाणी आणि चिली फ्लेक्स घालून हे चांगले परतायचे. 

९. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, कांद्याची पात आणि बटर घालून पुन्हा चांगले एकजीव करायचे.

१०. तयार झालेला हा सॉस परतलेल्या कोबीवर घालायचा आणि मधल्या वेळेचा स्नॅक्स म्हणून खायचे.    

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.