Lokmat Sakhi >Food > पेरु जास्त पिकले, मऊ झाले? करा आंबटगोड पेरु कँडी, पेरुचा असा भन्नाट पदार्थ तुम्ही खाल्लाच नसेल...

पेरु जास्त पिकले, मऊ झाले? करा आंबटगोड पेरु कँडी, पेरुचा असा भन्नाट पदार्थ तुम्ही खाल्लाच नसेल...

How to Make Guava Candy : Guava Candy Recipe : Homemade Guava Candy : जेवणानंतर मुखवास म्हणून खाण्यासाठी तुम्ही हिरव्यागार पेरूची कँडी नक्की ट्राय करू शकता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2024 02:04 PM2024-11-16T14:04:35+5:302024-11-16T14:17:10+5:30

How to Make Guava Candy : Guava Candy Recipe : Homemade Guava Candy : जेवणानंतर मुखवास म्हणून खाण्यासाठी तुम्ही हिरव्यागार पेरूची कँडी नक्की ट्राय करू शकता...

Guava Candy Recipe How to Make Guava Candy Homemade Guava Candy | पेरु जास्त पिकले, मऊ झाले? करा आंबटगोड पेरु कँडी, पेरुचा असा भन्नाट पदार्थ तुम्ही खाल्लाच नसेल...

पेरु जास्त पिकले, मऊ झाले? करा आंबटगोड पेरु कँडी, पेरुचा असा भन्नाट पदार्थ तुम्ही खाल्लाच नसेल...

थंडीच्या सीझनमध्ये बाजारांत फळं, भाज्या अगदी ताज्या, फ्रेश आणि उत्तम मिळतात. सध्या बाजारात मस्त हिरवेगार आंबटगोड चवीचे पेरू विकण्यासाठी ठेवल्याचे दिसायला सुरूवात होते. असे हिरवेगार पेरु आपण लगेच विकत घेतो. छान, चवदार पिकलेले पेरू विकत घेऊन त्यांच्या फोडींना तिखट मीठ लावून  खाणं सर्वांनाच आवडत. तर काहीजण नुसता पेरू खाणंच पसंत करतात. काहीवेळा बाजारांत एकदम फ्रेश दिसले म्हणून आपण एकाच वेळी भरपूर पेरू घेऊन येतो. परंतु असे पेरु काही दिवसांनी जास्त पिऊन मऊ पडतात किंवा खराब होतात. अशावेळी हे पिकून मऊ पडलेले पेरु खाणं कुणालाही आवडत नाही तसेच इतके पेरु आपण फेकूनही देऊ शकत नाही. अशावेळी या पिकलेल्या पेरूंच नेमकं करायचं काय असा प्रश्न पडतो(Guava Candy Recipe).

अशा परिस्थिती, आपण हे पिकलेले पेरु फेकून न देता त्यापासून झटपट तयार होणारी आंबटगोड पेरु कँडी तयार करु शकतो. यंदाच्या हिवाळ्यात ही साधी सोपी रेसिपी असणारी आंबटगोड चवीची पेरु कँडी नक्की ट्राय करून पहा. पेरूची कँडी तयार करण्यासाठी तुम्हाला फार काही कराव लागणार नाही. बेसिक साहित्यापासून (Homemade Guava Candy) तुम्ही झटपट पेरूची कँडी तयार करु शकता. पेरूची कँडी खायला चटपटीत,  स्वादीष्ट असल्यामुळे जेवणानंतर मुखवास म्हणून देखील आपण ती खाऊ शकता(How to make Guava Candy).

साहित्य :- 

१. पेरु - ४ ते ५ (संपूर्ण पिकलेले)
२. साखर - १ कप 
३. बटर / तूप - १ टेबलस्पून 
४. आयसिंग शुगर किंवा पिठीसाखर - २ टेबलस्पून 

खाऊन तर पाहा आवळा आणि ओल्या हळदीचा आंबटगोड ठेचा, हिवाळ्यातल्या जेवणाची वाढते रंगत...


डाळीला कीड लागते? चमचाभर ‘हे’ तेल लावून ठेवा, किडे न होता डाळ टिकेल वर्षभर...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी जास्त पिकून नरम झालेले पेरु घेऊन ते स्वच्छ धुवून त्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्यावेत. आता हे पेरुचे तुकडे कुकर मध्ये किंवा  खाली गरम पाण्याचा टोप ठेवून त्यावर चाळणीत हे तुकडे ठेवून हलकेच वाफवून घ्यावे. 
२. वाफवून झाल्यावर पेरुचे तुकडे थोडे थंड होऊ द्यावेत. थंड झाल्यावर हे पेरुचे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन ते बारीक वाटून त्याची पातळ प्युरी करुन घ्यावी. ही तयार प्युरी बारीक गाळणीच्या मदतीने व्यवस्थित गाळून घ्यावी. 
३. आता एक पॅन घेऊन त्यात ही प्युरी आणि साखर एकत्रित घालून हे मिश्रण चांगले शिजवून घ्यावे. ही प्युरी जेव्हा शिजत येईल तेव्हा यात आपल्या आवडीप्रमाणे बटर किंवा तूप घालावे. परत मिश्रण २ ते ४ मिनिटे शिजवून घ्यावे. जेव्हा हे मिश्रण संपूर्णपणे शिजून पॅनच्या कडा सोडून थोडे जाडसर आणि घट्ट होईल तेव्हा गॅस बंद करून. काचेच्या किंवा स्टीलच्या डिशमध्ये ओतून चमच्याने पसरुवून थोडावेळ सेट होण्यासाठी तसेच ठेवावे. 

फक्त चहाच नाही थंडी प्या ‘ही’ ६ पेयं, कुडकुडणाऱ्या थंडीतही आजार राहतील कायम दूर...

४. थोड्यावेळाने मिश्रण थंड झाल्यावर आपल्या आवडत्या आकारात सुरीच्या मदतीने या मिश्रणाच्या वड्या पाडून घ्याव्यात. 
५. आता एका बाऊलमध्ये आयसिंग शुगर किंवा पिठीसाखर घेऊन त्यात या पेरूच्या कॅंडीज घोळवून घ्याव्यात. जेणेकरुन या पेरूच्या कॅंडीजवर आयसिंग शुगरचे कोटिंग येईल. 

अशाप्रकारे यंदाच्या हिवाळ्यात मस्त हिरव्यागार पेरुच्या आंबटगोड चवीच्या पेरु कॅंडीज नक्की करुन पाहाच.

Web Title: Guava Candy Recipe How to Make Guava Candy Homemade Guava Candy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.