हिवाळा सुरू झाला आहे. त्यामुळे बाजारात पेरू मोठ्या संख्येने आलेले दिसतात. पेरू पाहिले की ते घेऊन खाण्याचा मोह आवरत नाही. मीठ आणि तिखट भुरभुरून पेरुची रसाळ फोड खाणं म्हणजे आहाहा... अशा पद्धतीने नुसता पेरू तर छानच लागतो. पण कधी कधी त्याचा आणखी वेगवेगळ्या पद्धतीने आस्वाद घेण्यासाठी आपण पेरूचं लोणचं, पेरूची चटणी, पेरूची भाजी असे वेगवेगळे पदार्थही करतो. आता या नेहमीच्या पदार्थांपेक्षा थोडासा वेगळा आणि बच्चे कंपनीला खूप आवडणारा एक पदार्थ करून पाहा. तो पदार्थ म्हणजे पेरूची जेली (most simple recipe of making guava jelly). ही रेसिपी पाहून जर तुम्ही जेली घरी तयार केली तर इथून पुढे बाजारातून पेरुची जेली विकत आणणं विसरून जाल.(how to make guava jelly and jam without any preservatives and gelatin?)
पेरूची जेली करण्याची रेसिपी
साहित्य
३ मध्यम आकाराचे पिकलेले पेरू. (पेरूची जेली करण्यासाठी कधीही कच्चे पेरू वापरू नका. पिवळेधमक, पिकलेले पेरूच जेली करण्यासाठी वापरावेत.)
साधारण १ वाटी साखर
नेहमीच विकतचं दही खाता? आरोग्यासाठी ते कितपत चांगलं? दही विकत आणताना ३ गोष्टी तपासा
लिंबाचा रस
कृती
सगळ्यात आधी पेरूच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या.
कुकरमध्ये एक डब्बा ठेवा आणि त्यात पेरूच्या फोडी टाका. त्या फोडी बुडतील एवढेच पाणी त्यामध्ये घाला. त्यानंतर मध्यम आचेवर दोन ते तीन शिट्ट्या होऊन पेरू शिजवून घ्या.
शिजवून झालेला पेरू थंड झाल्यानंतर एका स्वच्छ, स्तुती कपड्यात टाका आणि त्यातलं पाणी पूर्णपणे गाळून घ्या आता जे पाणी तयार झालेलं आहे त्या पाण्यापासून आपल्याला जेली तयार करायची आहे.
रात्री दूध पिणं सगळ्यात जास्त फायदेशीर! तज्ज्ञ सांगतात दूध पिण्याची योग्य पद्धत- होतील ३ फायदे
पेरु शिजवल्यानंतर जेवढं पाणी आपण गाळून घेतलं असेल तर तेवढीच त्यात साखर घालावी. आणि प्रत्येक कपाला १ चमचा याप्रमाणे लिंबाचा रस घालावा. म्हणजेच पेरु शिजवल्यानंतर जर तुमच्याकडे १ कप पाणी तयार झालेलं असेल तर त्यात १ कप साखर आणि १ चमचा लिंबाचा रस घालावा.
हे तिन्ही पदार्थ एकत्र करून कढईमध्ये गॅसवर गरम करायला ठेवावे. गॅस मध्यम आचेवर असावा. तसेच ते मिश्रण नेहमी हलवत ठेवावे. साधारण १० मिनिटांनी मिश्रण घट्ट झालं आहे, असं जाणवल्यास गॅस बंद करावा.
नैनीतालच्या लोकांना आवडते आहे कांदा- लसूणची खीर!! हा कोणता पदार्थ- का झाला एवढा लोकप्रिय?
यानंतर जेली एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावी. थंड झाली की ती सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये ४ ते ५ तासांसाठी ठेवून द्या. त्यानंतर अतिशय उत्तम पद्धतीची, चवदार जेली तयार झालेली असेल.