जॅम- जेली हे पदार्थ लहान मुलांच्या आवडीचे. ब्रेड, पोळी, पराठे या पदार्थांसोबत जॅम- जेली खायला चवदार लागतात. लहान मुलांनाच नाही तर अगदी मोठ्या माणसांनाही हे पदार्थ आवडतात. पण विकतच्या जॅम- जेलीमध्ये साखर आणि इतर प्रिझर्व्हेटीव्ह भरपूर प्रमाणात असल्याने हे पदार्थ आरोग्यासाठी खूप काही चांगले नसतात. त्यामुळे कोणतेही केमिकल्स न घालता घरच्याघरी केलेली पेरुच्या जेलीची (Guava jam with just 3 ingredients) ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा (simple recipe of Guava Jelly or Guava Jam). चव तुम्हाला आणि मुलांना नक्कीच आवडेल.
कशी करायची पेरुची जेली?साहित्य३ ते ४ पिकलेले पेरूसाखर लिंबाचा रस
कृती१. सगळ्यात आधी पेरुच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. या फोडी कुकरच्या भांड्यात टाका फोडी बुडतील एवढेच पाणी त्यात घाला. कुकरच्या ३ ते ४ शिट्ट्या होऊ द्या आणि गॅस बंद करा.
न्यू इयर पार्टीसाठी कमी वेळात झटपट तयार व्हायचंय? ५ मेकअप टिप्स.. दिसाल एकदम सुंदर- स्टायलिश
२. त्यानंतर हे मिश्रण कुकरमधून बाहेर काढा आणि थंड होऊ द्या. मिश्रण थंड झालं की एका गाळणीने किंवा स्वच्छ सुती कपड्याने गाळून घ्या. पेरुच्या फोडींचा गाळ वेगळा काढून टाका. आपल्याला पाण्याचा वापर करून जेली करायची आहे.
३. आता हे पाणी जेवढे असेल तेवढेच किंवा त्याचा पाऊण भाग या प्रमाणात साखर टाका. साखर आणि पेरुचं पाणी एका कढईमध्ये टाकून किंवा जर्मनच्या भांड्यात टाकून गॅसवर उकळायला ठेवा.
तडकेवाला गाजर हलवा... एकदा खायलाच हवा, बघा या अस्सल पंजाबी पदार्थाची व्हायरल रेसिपी
४. पेरुचं पाणी एक कप असेल तर त्यात २ टेबलस्पून याप्रमाणे लिंबाचा रस टाकावा. चिमुटभर मीठ टाकावं आणि हे मिश्रण मध्यम आचेवर उकळत ठेवावं. अधूनमधून हलवत रहावं.
५. पाणी आळून येईल आणि त्यात घट्टपणा येईल, तेव्हा गॅस बंद करावा. जेली झाली की नाही हे बघण्यासाठी एका ताटलीमध्ये त्या मिश्रणाचा एक थेंब टाका. ताटली उभी धरा. थेंब लगेचच ओघळला तर आणखी थोडं आटू द्या. नाहीतर गॅस बंद करा.
६. तयार झालेली जेली काचेच्या बरणीत भरून ठेवा. थंड झाल्यावर बरणीचं झाकण लावा. पुर्णपणे थंड झाल्यावर जेली आणखी घट्ट होते.