Join us  

थंडीत ताज्या पेरुचं करा चटपटीत लोणचं, ५ मिनिटांत करता येतील अशा ३ रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 4:39 PM

Guava Recipes : तोंडी लावण्यासाठी पेरूचे लोणचं, चटणी, भाकरीबरोबर खाण्यासाठी पेरूची चटपटीत, चविष्ट भाजी किंवा नैवेद्याला दाखवण्यासाठी पेरूची खीर असे वेगेवगळे पदार्थ करू शकता. 

हिवाळ्याच्या (Winter Special Recipes) दिवसांत बाजारात ताजे पेरू भरपूर विकले जातात. पेरू असेच तर तुम्ही नेहमीच खात असाल. ताज्या पेरूचा वापर तुम्ही वेगेवगळ्या पदार्थांमध्येही करू शकता. (Cooking Hacks) जेवताना तोंडी लावण्यासाठी पेरूचे लोणचं, चटणी, भाकरीबरोबर खाण्यासाठी पेरूची चटपटीत, चविष्ट भाजी किंवा नैवेद्याला दाखवण्यासाठी पेरूची खीर असे वेगेवगळे पदार्थ पेरूचा वापर करून तुम्ही बनवू शकता.  (How to Make Guava Chat And Guava Pickle)

1) पेरूचे लोणचं (Guava Pickle Recipe)

चटपटीत पेरूचं लोणचं करण्यासाठी सगळ्यात आधी  ताजे पेरू स्वच्छ धुवून घ्या.  शक्यतो पिकलेले पेरू असतील असे पाहा. पेरूच्या बारीक फोडी करून घ्या. पेरूमध्ये लाल तिखट, मीठ, चाट मसाला आणि लिंबू घालून एक पदार्थ तयार  करून घ्या. तयार आहे चटपटीत पेरू चाट. याला तुम्ही पेरूचे लोणचंही म्हणू शकता. पेरूचं इस्टंट लोणचं करण्याची ही सोपी पद्धत आहे. 

सॉफ्ट-जाळीदार इडल्या करण्यासाठी खास टिप्स; तांदूळ वाटताना 'हा' पदार्थ घाला, पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या

२) पेरूची भाजी (Guava Sabji)

पेरूचे लांब लांब तुकड्यांमध्ये कापून एका बाजूला ठेवून द्या.. एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी द्या. नंतर त्यात  हिंग, लाल मिरची, धणे पावडर, मीठ आणि हळद मिसळा. त्यात दही आणि टोमॅटोचे काप घालून ५ मिनिटं परतवून घ्या. त्यात १०० मिलीलिटर पाणी घालून पुन्हा उकळून घ्या. नंतर पेरू घालून चमच्याने मिसळून झाकण लावून शिजवून घ्या.  त्यात बडीशेप, साखर, आमसूल पावडर आणि गरम मसाला घाला. लिंबाचा रस घालून पुन्हा एकजीव करून घ्या. पुरी किंवा चपातीबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता.

३) पेरूची खीर (Guava Kheer Recipe)

पेरूची खीर करण्यासाठी १ शिट्टी काढून कुकरमध्ये पेरू शिजवून घ्या. पेरू पूर्णपणे थंड झाल्यानंतर गाळणीच्या  साहाय्याने प्युरी बनवून घ्या. नॉन स्टिक पॅनमध्ये तूप गरम करा. त्यात नट्स, ड्रायफ्रुट्स घालून हलंक भाजून घ्या. दुधाला उकळ आल्यानंतर त्यात दूध, खवा आणि साखर घालून उकळून व्यवस्थित मिसळा.त्यात पेरूचे मिश्रण घाला. खीर घट्ट झाल्यांतर आच बंद करा. त्यात वेलची पावडर घालून पुन्हा मिसळून घ्या. 

४) पेरूची चटणी (Guava Chutney Recipe)

पेरूची चटणी करण्यासाठी एका भांड्यात पेरू, मीठ, कोथिंबीर, जीर, लिंबाचा रस मिरची हे सर्व जिन्नस घालून ब्लेंडरमध्ये बारीक पेस्ट तयार करून  घ्या. तयार आहे चमचमीत पेरूची चटणी. ही चटणी तुम्ही समोश्याबरोबर किंवा पॅटिसबरोबर खाऊ शकता. याशिवाय जेवताना तोंडी लावण्यासाठीही खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स