Lokmat Sakhi >Food > Gudhi Padwa 2022 : गुढी पाडव्याला श्रीखंड विकत आणता? यंदा घरीच करुन पाहा, घ्या सोपी रेसिपी...

Gudhi Padwa 2022 : गुढी पाडव्याला श्रीखंड विकत आणता? यंदा घरीच करुन पाहा, घ्या सोपी रेसिपी...

Gudhi Padwa 2022 :श्रीखंड किंवा आम्रखंड पुरीचा बेत म्हणजे गुढी पाडव्याच्या दिवशी पर्वणीच. गुढीला नैवेद्य दाखवून मस्त गारेगार श्रीखंड आणि गरमागरम पुरी असली की सोबत आणखी काही नसले तरी चालते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 04:31 PM2022-03-30T16:31:51+5:302022-03-30T16:55:23+5:30

Gudhi Padwa 2022 :श्रीखंड किंवा आम्रखंड पुरीचा बेत म्हणजे गुढी पाडव्याच्या दिवशी पर्वणीच. गुढीला नैवेद्य दाखवून मस्त गारेगार श्रीखंड आणि गरमागरम पुरी असली की सोबत आणखी काही नसले तरी चालते.

Gudhi Padwa 2022: Do you buy Shrikhand for Gudi Padwa? Try it at home this year, take a simple recipe ... | Gudhi Padwa 2022 : गुढी पाडव्याला श्रीखंड विकत आणता? यंदा घरीच करुन पाहा, घ्या सोपी रेसिपी...

Gudhi Padwa 2022 : गुढी पाडव्याला श्रीखंड विकत आणता? यंदा घरीच करुन पाहा, घ्या सोपी रेसिपी...

Highlightsआवडीनुसार तुम्ही यामध्ये आंब्याचा रस घालून आम्रखंड करु शकतातुम्हालाही श्रीखंडात थोड्या गुठळ्या आवडत असतील तर तुम्ही मिक्सरपेक्षा हातानेही ढवळू शकता.

सण म्हटला की गोडाधोडाचं जेवण ओघानेच आले. महाराष्ट्रात प्रत्येक सणाला गोड काय हे साधारणपणे ठरलेले असते. होळीला पुरणपोळी, मकरसंक्रांतीला गुळाची पोळी तसं चैत्र पाडव्याला श्रीखंड किंवा आम्रखंड आवर्जून केले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला गारवा मिळण्यासाठी उपयुक्त असलेले श्रीखंड म्हणजे आपल्यापैकी अनेकांचा वीक पॉईंट. श्रीखंड किंवा आम्रखंड पुरीचा बेत म्हणजे गुढी पाडव्याच्या (Gudhi Padwa 2022 ) दिवशी पर्वणीच. गुढीला नैवेद्य दाखवून मस्त गारेगार श्रीखंड आणि गरमागरम पुरी असली की सोबत आणखी काही नसले तरी चालते. 

(Image : Google)
(Image : Google)

पूर्वी प्रत्येक गोष्ट घरातच केली जायची. विकत मिळण्याची पद्धत तेव्हा नव्हतीच. त्यामुळे घरातच दह्याचा चक्का करणे, तो खुंटीला टांगून मुरवायलवा ठेवणे, त्यामध्ये साखर घालून तो कितीतरी वेळ घोटणे अशा सगळ्या गोष्टी घरात केल्या जात. पण जसा काळ बदलला तशा स्त्रियाही घराबाहेर पडू लागल्या आणि सध्या तर बहुतांश गोष्टी या रेडिमेड मिळायला लागल्या. रेडीमेड पदार्थ आणणे सोपे असले तरी त्या पदार्थाला घरातील व्यक्तींनी प्रेमाने आणि कष्ट घेऊन केलेल्या पदार्थांची सर नक्कीच येणार नाही. त्यामुळे यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्हीही घरच्या घरी श्रीखंड ट्राय करु शकता. आता श्रीखंड घरी कसे करायचे तर बाजारातून चक्का आणायचा आणि करायचे असे तुम्हाला वाटेल. ही झाली त्यातल्या त्यात सोपी पद्धत. पण चक्काही घरी करता येतो तो कसा ते पाहूया. 

साहित्य - 

१. दही - अर्धा किलो 

२. वेलची पूड - १ चमचा 

३. साखर - अर्धा किलो 

४. बदाम व पिस्त्याचे तुकडे - अर्धी वाटी 

५. केशर - ३ ते ४ काड्या 

६. दूध - अर्धी वाटी 

(Image : Google)
(Image : Google)

कृती - 

१. सगळ्यात आधी घट्टसर दही एका स्वच्छ कापडात बांधून ठेवा. या दह्यातील पाण्याचा अंश निघणे महत्त्वाचे असून ते वरती टांगलेले राहील अशापद्धतीने एखाद्या सुती कापडात ठेवा. 

२. साधारणपणे आदल्या दिवशी रात्री ठेवले तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्यातील पाणी कापडातून खाली पडते किंवा कापडात शोषले जाते. 

३. हे कापड दुसऱ्या दिवशी काढून त्यातील दही कापडासकट पिळून घ्या. पाण्याचा अंश कमी झाल्यावर त्याचा चक्का तयार होतो. हा चक्का एका भांड्यात काढा. त्यामध्ये साखर आणि वेलची पूड घालून सगळे एकजीव फेटून घ्या. 

४. काहीवेळ हे मिश्रण मुरण्यासाठी तसेच ठेवा. त्यानंतर हा चक्का पुरणयंत्रातून किंवा मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घ्या. दह्याच्या गाठी आणि साखर अगदी मऊ होईपर्यंत फेटा. पूर्वी मिक्सर नव्हते तेव्हा हा चक्का आणि साखर हातानेच फेटली जायची. कित्येक तास हाताने हे दोन्ही एकत्र करुन रात्रभर तसेच ठेवल्यानंतर दुसऱ्यादिवशी साखर आणि चक्का एकजीव होत असे. तुम्हालाही श्रीखंडात थोड्या गुठळ्या आवडत असतील तर तुम्ही मिक्सरपेक्षा हातानेही ढवळू शकता. आवडीनुसार तुम्ही साखर कमी-जास्त करु शकता. 

५. एका वाटीत दूध घेऊन केशर आणि वेलची पावडर मिसळा आणि दुधात छान ऑरेंज रंग आल्यानंतर हे दूध दह्यात घाला आणि चमच्याचे व्यवस्थित एकत्र करा. यामध्ये आता त्यात आवडीनुसार बदाम आणि पिस्त्याचे काप घाला. 

६. घरच्या घरी तयार झालेले हे श्रीखंड गार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. आवडीनुसार तुम्ही यामध्ये आंब्याचा रस घालून आम्रखंड करु शकता. तसेच हल्ली अनेकांना फ्रूट घातलेले फ्रूटखंडही आवडते. त्यासाठी तुम्हाला आवडतील त्या फळांच्या फोडी यामध्ये घाला. 

 


Web Title: Gudhi Padwa 2022: Do you buy Shrikhand for Gudi Padwa? Try it at home this year, take a simple recipe ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.