Lokmat Sakhi >Food > गुढीपाडवा : घरीच चक्का लावून ताजं-घट्ट स्वादिष्ट आम्रखंड करण्यासाठी ३ टिप्स, अस्सल मराठी चवीचं श्रीखंड

गुढीपाडवा : घरीच चक्का लावून ताजं-घट्ट स्वादिष्ट आम्रखंड करण्यासाठी ३ टिप्स, अस्सल मराठी चवीचं श्रीखंड

Amarkhand recipe: How to make Amarkhand at home: Gudhi Padwa special recipes: Amarkhand for Gudhi Padwa: Easy Amarkhand recipe: Traditional Amarkhand preparation: Sweet dishes for Gudhi Padwa: अर्ध्या तासात बनलं जाणार सोप्या पद्धतीचे आम्रखंड.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2025 10:58 IST2025-03-25T10:57:32+5:302025-03-25T10:58:08+5:30

Amarkhand recipe: How to make Amarkhand at home: Gudhi Padwa special recipes: Amarkhand for Gudhi Padwa: Easy Amarkhand recipe: Traditional Amarkhand preparation: Sweet dishes for Gudhi Padwa: अर्ध्या तासात बनलं जाणार सोप्या पद्धतीचे आम्रखंड.

gudhi padwa special how to make amarkhand recipe at home follow this simple easy tips | गुढीपाडवा : घरीच चक्का लावून ताजं-घट्ट स्वादिष्ट आम्रखंड करण्यासाठी ३ टिप्स, अस्सल मराठी चवीचं श्रीखंड

गुढीपाडवा : घरीच चक्का लावून ताजं-घट्ट स्वादिष्ट आम्रखंड करण्यासाठी ३ टिप्स, अस्सल मराठी चवीचं श्रीखंड

हिंदू नववर्षाचा पहिला सण गुढीपाडवा. या दिवशी दारोदारी गुढी उभारली जाते तर घरोघरी श्रीखंड पुरीचा बेत आखला जातो.(Gudhi Padwa special recipes) सणासुदीच्या काळात आपण श्रीखंड नेहमीच बाहेरुन आणतो. परंतु, बाहेरुन आणलेल्या श्रीखंडाची चव कधी खूपच आंबट लागते तर कधी अधिकच गोड. घरच्या घरी सोप्या पद्धतीने श्रीखंड केल्यास जेवणाची चव देखील दुप्पटनी वाढते.(How to make Amarkhand at home) 
सध्या उन्हाळा सुरु झाला असून आंब्याचा मोसम सुरु आहे. गुढीपाडव्यानिमित्त आपण श्रीखंडाची वेगळ्या पद्धतीने चव चाखू शकतो त्यातील एक आम्रखंड.(Amarkhand for Gudhi Padwa) आम्रखंड कसे बनवायचे पाहूया सोपी रेसिपी. दह्यापासून चक्का तयार करुन त्याच श्रीखंड बनवलं जाते. अर्ध्या तासात बनलं जाणार सोप्या पद्धतीचे आम्रखंड. बनवताना या ३ टिप्स कायमच लक्षात ठेवा. (Easy Amarkhand recipe)

'या'५ फळांमुळे उन्हाळ्यात होतो अधिक त्रास, पोटदुखीसह आम्ल-पित्तही वाढते...


साहित्य 
ताजे दही - १ किलो
आंब्याचा प्लप- अर्धी वाटी
पीठी साखर - अर्धी वाटी
केशर दूध - २ चमचे
फ्रेश क्रीम- आवश्यकतेनुसार 
पिस्ता - आवश्यकतेनुसार 
वेलची पावडर - चवीनुसार

">

 

कृती 

1. सगळ्यात आधी दह्यातील पाणी काढण्यासाठी एका टोपात चाळणी ठेवून त्यावर कॉटनचा कपडा ठेवा, आता त्यावर दही घालून कापड नीट बंद करुन फ्रीजमध्ये रातभर ठेवा. यामुळे दह्यातील पाणी निघून जाण्यास मदत होईल. 

2. दह्यातील पाणी निघाल्यानंतर ते हलक्या हाताने मॅश करुन घ्या, त्याचा चक्का तयार होईल. 

3. चक्का चांगला फेटल्यानंतर त्यात आंब्याचा प्लप घालून चांगले फेटा. आता त्यात केशर दूध, फ्रेश क्रीम, पिस्ता, वेलची पावडर आणि पीठी साखर घालून चांगले मिक्स करा. 

4. वरुन आंब्याचे काप लावून तयार होईल. घट्ट स्वादिष्ट असं  मराठी चवीचं श्रीखंड. 
 

Web Title: gudhi padwa special how to make amarkhand recipe at home follow this simple easy tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.