Lokmat Sakhi >Food > गुढी पाडव्याला यंदा घरीच करा चक्का, परफेक्ट श्रीखंडासाठी चक्का करण्याची योग्य पद्धत

गुढी पाडव्याला यंदा घरीच करा चक्का, परफेक्ट श्रीखंडासाठी चक्का करण्याची योग्य पद्धत

Gudi Padwa Special How To Make Shrikhand At Home : विकत आणण्यापेक्षा घरच्या घरीच श्रीखंड कसं तयार करायचं याविषयी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2023 02:37 PM2023-03-19T14:37:31+5:302023-03-20T12:26:39+5:30

Gudi Padwa Special How To Make Shrikhand At Home : विकत आणण्यापेक्षा घरच्या घरीच श्रीखंड कसं तयार करायचं याविषयी..

Gudi Padwa 2023 : Make Padwa a great Srikhand-Puri recipe, an easy recipe to make Chakka-Shrikhand at home in a traditional way... | गुढी पाडव्याला यंदा घरीच करा चक्का, परफेक्ट श्रीखंडासाठी चक्का करण्याची योग्य पद्धत

गुढी पाडव्याला यंदा घरीच करा चक्का, परफेक्ट श्रीखंडासाठी चक्का करण्याची योग्य पद्धत

गुढी पाडवा हा सण म्हणजे श्रीखंड-पुरीचा बेत ठरलेलाच. महाराष्ट्र म्हणजे दर महिन्याला काही ना काही सण असतातच. या प्रत्येक सणाला गोडाधोडाचे काय करायचे हेही ठरलेले असते. चैत्र पाडवा उन्हाळ्यात येत असल्याने या दिवशी आवर्जून श्रीखंड किंवा आम्रखंड केले जाते. दूधाचं दही करुन या दह्यातील पाणी काढून दह्यापासून चक्का करायचा. हा चक्का घट्ट करुन त्यापासून श्रीखंड किंवा आम्रखंड केले जाते. साधारणपणे घरात चक्का आणि श्रीखंड करायचे असेल तर ते २ ते ३ दिवस आधीच करावे लागते. कारण हे श्रीखंड जेवंढ मुरतं तेवढं ते जास्त चांगलं लागतं. विकत आणलेल्या श्रीखंडाला घरात केलेल्या चक्क्याची किंवा श्रीखंडाची मजा येत नाही. पूर्वीच्या काळी श्रीखंड विकत मिळत नव्हते तेव्हा ते घरीच केले जायचे. पारंपरिक पद्धतीने घरी चक्का करुन हे श्रीखंड कसे करायचे पाहूया (Gudi Padwa Special How To Make Shrikhand At Home)...

१. श्रीखंड तयार करण्यासाठी सायीसकट दही तयार करायचे. यासाठी साधारण १ लिटर दुधाचे दही लावू शकतो. याचे अर्धा ते पाऊण किलो श्रीखंड तयार होते. 

(Image : Google)
(Image : Google)

२. दही व्यवस्थित लागले की ते एखाद्या सुती कपड्यात वरच्या बाजूला टांगून ठेवावे.

३. असे केल्याने यातील पाणी गाळले जाऊन त्याचा घट्टसर गोळा तयार होईल.

४.  बाहेर ठेवल्यामुळे आणि पाण्याचा अंश गेल्यामुळे याचा चक्का तयार होतो. 

(Image : Google)
(Image : Google)

५. थोडा आंबटसर असलेल्या या चक्क्याचे जेवढे वजन असेल तेवढी साखर घालून नीट मिसळायचे. 

६. साखर त्यामध्ये एकजीव होण्यासाठी आणि चक्का मऊसर होण्मयासाठी तो डावाने किंवा मिक्सरमध्ये चांगला एकजीव करुन घ्यावा लागतो.

७. श्रीखंडाला स्वाद येण्यासाठी त्यामध्ये वेलची पूड, केशर, जायफळ आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो. 

८. याशिवाय आवडीनुसार आपण यामध्ये फळांचे तुकडे, आंब्याचा पल्प, सुकामेवा घातला तरी श्रीखंड चांगले लागते. 

Web Title: Gudi Padwa 2023 : Make Padwa a great Srikhand-Puri recipe, an easy recipe to make Chakka-Shrikhand at home in a traditional way...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.