Lokmat Sakhi >Food > Gudi Padwa 2023 : पाडव्याला श्रीखंड-पुरीचा बेत कराच, पण कडूनिंबाची चटणीही खा..राहाल वर्षभर फिट अँड फाईन...

Gudi Padwa 2023 : पाडव्याला श्रीखंड-पुरीचा बेत कराच, पण कडूनिंबाची चटणीही खा..राहाल वर्षभर फिट अँड फाईन...

Gudi Padwa 2023 Neem Leaves Chutney Recipe And its Benefits : कडू असली तरी ही चटणी औषधी असून आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याने या दिवशी मुद्दाम ही चटणी खाल्ली जाते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2023 06:37 PM2023-03-17T18:37:52+5:302023-03-17T18:39:34+5:30

Gudi Padwa 2023 Neem Leaves Chutney Recipe And its Benefits : कडू असली तरी ही चटणी औषधी असून आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याने या दिवशी मुद्दाम ही चटणी खाल्ली जाते.

Gudi Padwa 2023 Neem Leaves Chutney Recipe And its Benefits : Have Srikhand-puri for Padwa, but also eat neem chutney.. Stay fit and fine all year round... | Gudi Padwa 2023 : पाडव्याला श्रीखंड-पुरीचा बेत कराच, पण कडूनिंबाची चटणीही खा..राहाल वर्षभर फिट अँड फाईन...

Gudi Padwa 2023 : पाडव्याला श्रीखंड-पुरीचा बेत कराच, पण कडूनिंबाची चटणीही खा..राहाल वर्षभर फिट अँड फाईन...

गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. नवीन वर्षाचे स्वागत करताना आपण गोडाधोडाचा स्वयंपाक करतो. साधारणपणे अनेक घरांमध्ये या दिवशी श्रीखंड-पुरीचा बेत करण्याची रीत आहे. कधी तयार श्रीखंड किंवा आम्रखंड आणतो तर कधी चक्का आणून घरीच श्रीखंड करतो. श्रीखंडाचा बेत असेल तर पुऱ्या, भजी, मसालेभात हे ठरलेले बेत असतात. पण हे सगळे करत असताना यासोबत आवर्जून करायला आणि खायला हवी ती म्हणजे कडूनिंबाची चटणी. एरवी आपण सणावाराला आवर्जून चटणी, कोशिंबीर करतो. पण चैत्र पाडव्याला मात्र चविष्ट चटणी करण्याऐवजी   चवीला कडू असलेली कडूनिंबाची चटणी अवश्य करायला हवी. कडू असली तरी ही चटणी औषधी असून आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याने या दिवशी मुद्दाम ही चटणी खाल्ली जाते. ही चटणी कशी करायची आणि त्याचे फायदे काय याविषयी (Gudi Padwa 2023 Neem Leaves Chutney Recipe And its Benefits)...

कडूनिंबाच्या चटणीचे फायदे 

१. थंडीच्या काळात पौष्टिक पदार्थ खाल्ल्यानं शरीरात कफ साठतो, पण बाहेरच्या गार वातवरणामुळे तो शरीराबाहेर न पडता शरीरात साठून राहातो. पण बाहेरचं वातावरण जसं गरम होतं  त्या उष्णतेमुळे कफ पातळ होवून बाहेर पडायला लागतो. यासाठी कडूनिंब खाणे फायदेशीर असते. 

(Image : Google)
(Image : Google)

२. कडूनिंबाची पाने खाल्ल्याने पोटातील जंत दूर होऊन पचनाशी निगडीत समस्या दूर होण्यास मदत होते. 

३. कडूनिंबामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढून उन्हाळ्यात होणारे गोवर-कांजिण्या हे आजार दूर होण्यास मदत होते. 

४. कडूनिंबामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म असल्याने ही चटणी खाल्ल्याने शरीर डीटॉक्स होण्यास मदत होते. 

५. मधुमेहींना मेथ्या, कारले यांसारख्या कडू गोष्टी आवर्जून खाण्यास सांगितले जाते. कडूनिंबही कडू असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यासाठी कडूनिंब खाणे फायदेशीर ठरते.  

रेसिपी 

१. कडूनिंबाची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत.

(Image : Google)
(Image : Google)

२. यामध्ये चिंचेचा कोळ, साखर, मीठ, तिखट घालावे.

३. भिजलेले डाळ, दाणे किंवा खोबरं आवडीप्रमाणे घालू शकता. 

४. हे सगळे एकत्र केले की पाणी घालून हे मिश्रण एकजीव करावे. 

५. चिंच, गूळ आणि इतर गोष्टींमुळे कडूनिंबाचा कडवटपणा कमी होण्यास मदत होते. 

 

Web Title: Gudi Padwa 2023 Neem Leaves Chutney Recipe And its Benefits : Have Srikhand-puri for Padwa, but also eat neem chutney.. Stay fit and fine all year round...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.