Join us  

१ किलो दह्याच्या चक्क्यापासून घरीच करा ताजं-स्वादिष्ट श्रीखंड; विकतचं श्रीखंड नकोच म्हणाल अशी रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 10:09 AM

Gudi padwa 2023 : कमीत कमी अर्ध्या तासात घरगुती आणि अप्रतिम चवीचं श्रीखंड बनवून तयार होईल.

गुढीपाडव्याला सर्वांच्याच घरी श्रीखंड पुरीचा बेत असतो (Gudi Padwa Special Recipe)  श्रीखंड नेहमीच बाहेरून आणलं जातं.  घरच्याघरी सोप्या पद्धतीनं श्रीखंड केल्यास जेवणाची चव दुप्पटीनं वाढेल. श्रीखंड कसं बनवायचं, त्याची सोपी रेसेपी पाहूया. दुधापासून दही, दह्याचा चक्का आणि चक्क्याचं श्रीखंड तयार केलं जातं. चक्क्यापासून श्रीखंड तयार करण्याची सोपी रेसेपी पाहूया. कमीत कमी अर्ध्या तासात घरगुती अप्रतिम चवीचं श्रीखंड बनवून तयार होईल. (How to make shrikhand at home)

इस्टंट श्रीखंड कसं बनवायचं?

१) श्रीखंड बनवण्यासाठी सगळ्यात आधी १ किलो दही कापडात घालून त्यातलं पाणी काढून चक्का बनवून घ्या. हात स्वच्छ धुवून  हातानं चक्का एकसंध होईपर्यंत फेटून घ्या

२) चक्का व्यवस्थित फेटल्यानंतर त्यात आवडीनुसार पिठी साखर घाला. त्यानंतर वेलची पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्या.

३) श्रीखंडाची चव वाढवण्यासाठी त्यात दुधात मिसळून केसर घाला. त्यानतंर प्रेश क्रिम किंवा दुधावरची जाड साय तुम्ही या मिश्रणात घालू शकता.

४) बारीक केलेले बदामाचे काप, बारीक केलेले काजूचे काप आणि टुटी फ्रुटी घाला. तुम्हाला आवडत असल्यास यात चोको टिप्स घालू शकता. 

५) चाखून पाहिल्यानंतर कमी गोड लागत असल्यास त्यात पीठी साखर कमीत कमी पाण्यात विरघळवून घाला आणि मिश्रण एकजीव करा. तयार आहे स्वादीष्ट, चवदार श्रीखंड

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स