Lokmat Sakhi >Food > गुजराथी कॉर्न खिचडी! पावसाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी खास गरमागरम बेत, करायला सोपी-चवीला उत्तम- पचनाला हलकी

गुजराथी कॉर्न खिचडी! पावसाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी खास गरमागरम बेत, करायला सोपी-चवीला उत्तम- पचनाला हलकी

Gujarati Corn Khichadi: मुगाच्या डाळीची खिचडी तर नेहमीच करतो आपण... आता रात्रीच्या जेवणासाठी ही एक नव्या पद्धतीची खिचडी ट्राय करून पहा. अस्सल गुजराती चवीची कॉर्न खिचडी. (corn khichadi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 03:17 PM2022-07-14T15:17:05+5:302022-07-14T15:17:27+5:30

Gujarati Corn Khichadi: मुगाच्या डाळीची खिचडी तर नेहमीच करतो आपण... आता रात्रीच्या जेवणासाठी ही एक नव्या पद्धतीची खिचडी ट्राय करून पहा. अस्सल गुजराती चवीची कॉर्न खिचडी. (corn khichadi)

Gujarati Corn Khichadi Recipe: How to make makke ka kees or makkai no chevdo, Best one dish meal for monsoon | गुजराथी कॉर्न खिचडी! पावसाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी खास गरमागरम बेत, करायला सोपी-चवीला उत्तम- पचनाला हलकी

गुजराथी कॉर्न खिचडी! पावसाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी खास गरमागरम बेत, करायला सोपी-चवीला उत्तम- पचनाला हलकी

Highlightsगुजराथी काॅर्न खिचडी. गुजराथी भाषेत त्याला 'मक्काई नो चेवडो' असंही म्हणतात. पावसाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी वन डिश मिल म्हणून हा एक चांगला पदार्थ आहे.

कधी कधी दिवसभराचं काम संपवून संध्याकाळी एवढा थकवा आलेला असतो, की रात्रीच्या जेवणासाठी वेगळं काही करण्याची इच्छाच होत नाही. अशावेळी मग अनेक घरांमध्ये रात्रीच्या वेळी डाळ- तांदुळाचा कुकर गॅसवर चढवला जातो आणि मस्त गरमागरम खिचडी खाल्ली जाते. मुग डाळीची खिचडी (corn khichadi recipe) हा अनेकांचा अगदी आवडीचा पदार्थ. कारण ती पचायलाही अगदी हलकी असते. आता खिचडीचा हा आणखी एक नवा प्रकार ट्राय करून बघा. गुजराथी काॅर्न खिचडी. गुजराथी भाषेत त्याला 'मक्काई नो चेवडो' (tasty recipe of sweet corn) असंही म्हणतात. पावसाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी वन डिश मिल (one dish meal for dinner) म्हणून हा एक चांगला पदार्थ आहे. ही रेसिपी (food and recipe) इन्स्टाग्रामच्या bliss_is_food या पेजवर शेअर करण्यात आली आहे.

 

कॉर्न खिचडी रेसिपी
साहित्य

३ ते साडेतीन कप स्वीट कॉर्नचे दाणे, दिड टेबलस्पून तेल, दिड टेबलस्पून तूप, फोडणीसाठी मोहरी आणि जिरे, चिमुटभर हिंग, थोडीशी दालचिणी, ३ ते ४ सुकलेल्या लाल मिरच्या, कढीपत्ता, २ टेबलस्पून तीळ, २ टीस्पून आलं- लसूण पेस्ट, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, चवीनुसार मीठ, चवीसाठी साखर, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून धने- जिरे पावडर, थोडीशी हळद, काजू आणि मनुका, अर्धा कप दूध.

जगन्नाथ रथयात्रेचा प्रसाद बनवा घरी, भोग म्हणून खास ओडिसी खिरीची ही घ्या रेसिपी 
रेसिपी 
- सगळ्यात आधी कॉर्न मिक्सरमधून थोडे जाडेभरडे वाटून घ्या.
- त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करा. तेल तापल्यानंतर जिरे, मोहरी, हिंग टाकून फोडणी करून घ्या.
- त्यानंतर आलं- लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, लाल मिरच्या, कढीपत्ता, तीळ टाका. 
- आता वाटलेले कॉर्न टाका, एकदा सगळे मिश्रण हलवून घ्या आणि १० ते १५ मिनिटे त्यावर झाकण ठेवून वाफ येऊ द्या. अधून- मधून हलवत रहा.


- वाफ आल्यानंतर त्यात हळद, धने- जिरे पावडर, लिंबाचा रस, मीठ आणि थोडीशी साखर टाका. पुन्हा झाकण लावून वाफ येऊ द्या.
- त्यानंतर साधारण १० मिनिटांनी त्यात दूध टाका आणि पुन्हा एकदा वाफवून घ्या.
- आता एका छोट्या कढईत तूप तापायला ठेव. तुपामध्ये मंद आचेवर काजू आणि मनुका परतून घ्या.
- परतलेल्या काजू- मनुका कॉर्न खिचडीमध्ये तुपासकट टाका. वरतून थोडीशी कोथिंबीर टाका. 
- गरमागरम काॅर्न खिचडी झाली तयार. ही खिचडी तूप टाकून खा किंवा तशीच खाल्ली तरी चवदार लागते.  

 

Web Title: Gujarati Corn Khichadi Recipe: How to make makke ka kees or makkai no chevdo, Best one dish meal for monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.