Lokmat Sakhi >Food > Diwali : गुलाबजाम आईस्क्रीम यंदा करून तर पाहा, करायला सोपे आणि पाहुणेही विचारतील रेसिपी...

Diwali : गुलाबजाम आईस्क्रीम यंदा करून तर पाहा, करायला सोपे आणि पाहुणेही विचारतील रेसिपी...

Gulab Jamun Ice Cream : Unique Gulab Jamun Ice Cream Recipe : Creamy & Easy Gulab Jamun Ice Cream : 10 Minute Creamy Gulab Jamun Ice Cream : दिवाळीत गोडाधोडाचे पदार्थ म्हणून गुलाबजाम केले जातात, त्याचीच इंस्टंट आईस्क्रीम करण्याची रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2024 11:23 AM2024-10-26T11:23:39+5:302024-10-26T11:37:23+5:30

Gulab Jamun Ice Cream : Unique Gulab Jamun Ice Cream Recipe : Creamy & Easy Gulab Jamun Ice Cream : 10 Minute Creamy Gulab Jamun Ice Cream : दिवाळीत गोडाधोडाचे पदार्थ म्हणून गुलाबजाम केले जातात, त्याचीच इंस्टंट आईस्क्रीम करण्याची रेसिपी...

Gulab Jamun Ice Cream Unique Gulab Jamun Ice Cream Recipe 10 Minute Creamy Gulab Jamun Ice Cream | Diwali : गुलाबजाम आईस्क्रीम यंदा करून तर पाहा, करायला सोपे आणि पाहुणेही विचारतील रेसिपी...

Diwali : गुलाबजाम आईस्क्रीम यंदा करून तर पाहा, करायला सोपे आणि पाहुणेही विचारतील रेसिपी...

दिवाळी (Diwali 2024) सुरु होण्यासाठी आता फक्त काही दिवसांचाच अवकाश आहे. दिवाळीत शक्यतो आपण नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या घरी जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांची गाठभेट घेतो. दिवाळीत घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत आपण फराळ देऊन करतो. काहीवेळा दिवाळीत सगळ्यांच्याच घरी फराळाचे पदार्थ खाऊन आपल्याला फराळ नकोसा वाटतो. सारखे फराळाचे पदार्थ, गोडधोड मिठाया खाऊन उबग येतो. अशावेळी काहीतरी वेगळं खावंसं वाटत. पण अशा परिस्थितीत पाहुण्यांना नेमका वेगळा पदार्थ काय द्यावा असा प्रश्न आपल्याला पडतो. अशावेळी काहीतरी झटपट करता येईल असे इन्स्टंट पदार्थ आपण पटकन करतो(Gulab Jamun Ice Cream).

यंदाच्या दिवाळीत गोडधोड म्हणून लाडू, करंजी न देता आपण पटकन तयार होणारे गुलाबजामचे आईस्क्रीम (Unique Gulab Jamun Ice Cream Recipe) देऊ शकतो. याचबरोबर, दिवाळीत आपल्याकडे बरेचदा गोडाच्या पदार्थांमध्ये गुलाबजाम तयार केले जातात. जर असे जास्तीचे गुलाबजाम उरले असतील तर आपण त्याची ही इन्स्टंट होणारी आईस्क्रीम देखील आवडीने खाऊ शकतो. अगदी कमी साहित्यात झटपट तयार होणारे गुलाबजामचे आईस्क्रीम नक्की ट्राय करुन पाहा(10 Minute Creamy Gulab Jamun Ice Cream).

साहित्य :-

१. तयार गुलाबजाम - १ कप 
२. व्हॅनिला फ्लेवर्ड प्लेन आईस्क्रीम - ४ ते ५ स्कुप 
३. ड्रायफ्रुटसचे काप - २ टेबलस्पून 

Diwali : अंबानींच्या घरच्या लाडूंची व्हायरल चर्चा, पाहा ‘अंबानी लाडू’ करण्याची शाही रेसिपी, दिवाळी स्पेशल...

Diwali : यंदा भेट म्हणून द्या ड्रायफ्रुटसची घरीच केलेली अक्रोड -खजुराची शुगर फ्री बर्फी, करा अगदी झटपट...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी तयार गुलाबजामचे लहान तुकडे करून घ्यावेत. 
२. गुलाबजामचे छोटे तुकडे एका बाऊलमध्ये घेऊन त्यात व्हॅनिला आईस्क्रीमचे स्कुप घालून चमच्यांचा मदतीने हे दोन्ही पदार्थ कालवून एकजीव करून घ्यावेत. 

Diwali : यंदा दिवाळीत करा रतलामी शेव, घ्या परफेक्ट पारंपरिक रेसिपी - फराळाची वाढेल लज्जत...

३. आता हे मिश्रण एका डब्यांत ओतून घ्यावे. त्यानंतर त्यावर ड्रायफ्रुटसचे पातळ काप भुरभुरवून घ्यावेत. 
४. त्यानंतर बरोबर मधोमध कापून घेतलेले अर्धे गुलाबजाम एक एक अशा पद्धतीने ठेवून घ्यावेत, आता डब्याचे झाकण लावून तो फ्रिजरमध्ये २ ते ३ तास सेट होण्यासाठी ठेवून द्यावा. 

गुलाबजामचे आईस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे.


Web Title: Gulab Jamun Ice Cream Unique Gulab Jamun Ice Cream Recipe 10 Minute Creamy Gulab Jamun Ice Cream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.