आपल्याला अनेकदा गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. गोड पदार्थांमध्ये अनेक ऑप्शन आहे. गुलाब जामून, खीर, आईस्क्रीम असे पदार्थ आपण खाऊन पाहिलेच असेल. पण आपण कधी रसरशीत गुलगुले हा पदार्थ खाऊन पाहिला आहे का? गुलगुले हा पदार्थ पावसाळ्यात महाराष्ट्राच्या गावा - खेड्यात तयार केला जातो. हा पदार्थ चवीला तर उत्कृष्ट लागतोच, यासह आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर ठरते.
गुलगुले हा पदार्थ घरच्या साहित्यात झटपट तयार होतो. जर पावसाळ्यात काहीतरी गोड पण पौष्टीक खायचं असेल तर, गुलगुले ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा(Gulgule Recipe | How To Make Gulgule | MOTHER'S RECIPE | Quick Sweet Recipe).
गुलगुले करण्यासाठी लागणारं साहित्य
गुळ
पाणी
गव्हाचं पीठ
वेलची पूड
भाजणी न करता करा मालवणी वडे, मस्त खमंग आणि खुसखुशीत! करा खास पावसाळी बेत
खसखस
बेकिंग सोडा
कृती
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक वाटी गुळ घ्या, त्यात दोन वाटी पाणी मिक्स करून गुळ पाण्यात विरघळून घ्या. पाण्यात गुळ विरघळल्यानंतर गाळणीतून पाणी दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात एक वाटी गव्हाचं पीठ, एक चमचा वेलची पूड, एक चमचा खसखस घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करा. आता त्यावर ४ तासांसाठी झाकण ठेऊन पीठ भिजत ठेवा.
शिळ्या चपातीचं काय करावं सुचत नाही? १० मिनिटात करा कुरकुरीत डोसा, चव भन्नाट - टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन
४ तासानंतर त्यात चिमुटभर बेकिंग सोडा घालून मिक्स करा. दुसरीकडे एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. बोटांवर थोडे पाणी लावा, व तेल गरम झाल्यानंतर त्यात छोटे - छोटे आकाराचे गुलगुले सोडून मध्यम आचेवर तळून घ्या. अशा प्रकारे रसरशीत गुलगुले खाण्यासाठी रेडी.