Join us  

उन्हाने लाहीलाही झाली, घरीच करा हॉटेलसारखा गारेगार फालुदा, पोट-मनाला थंडावा देणारी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2023 4:33 PM

Gulkand Faluda Recipe Summer Special : घरच्या घरी सहज करता येणारी ही हेल्दी रेसिपी कशी करायची पाहूया...

उन्हाळ्याच्या दिवसांत डोक्यावर तापते ऊन असल्याने शरीराची लाहीलाही होते. उन्हाच्या कडाक्यामुळे आपल्याला सतत तहान लागते. त्यामुळे आपण सारखं पाणी पिऊन ही तहान भागवतो. अगदीच पाणी नको असेल तर आपण ताक, सरबत, नारळ पाणी, कोंल्ड्रींक असं काही ना काही घेत राहतो. कधीतरी आईस्क्रीम, मिल्क शेक, मस्तानी आणि फालुदाही घेतो. थंडीच्या दिवसांत दुधापासून तयार केले जाणारे हे पदार्थ घेतले की शरीराला आणि मनालाही एकप्रकारे थंडावा मिळतो. वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये खाल्ला जाणारा फालुदा हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. करायला अतिशय सोपा असणारा हा फालुदा बाहेर खूप जास्त महाग मिळतो. तसेच त्यामध्ये वापरलेले 1.सामान कितपत चांगले असते माहित नाही. म्हणूनच घरच्या घरी सहज करता येणारी ही हेल्दी रेसिपी कशी करायची पाहूया (Gulkand Faluda Recipe Summer Special)...

(Image : Google)

साहित्य -

१. रोज फ्लेवर कुल्फी – ३

२. दूध – अर्धा लीटर

३. सब्जा सीड्स – अर्धा कप

४. साखर - ३ चमचे

५. गुलकंद– ३ चमचे 

६. ड्राईफ्रूट्स  – अर्धी वाटी

७. शेवया - अर्धी वाटी

८. रोज सिरप - अर्धी वाटी

कृती -

१. सगळ्यात आधी सब्जा पाण्यात भिजवून ठेवा म्हणजे तो चांगला फुलतो.

२. यानंतर एका पातेल्यात थोडे पाणी आणि दूध घेऊन त्यामध्ये शेवया शिजवून घ्या. 

३. त्यात आवडीनुसार साखर घाला.

४. ड्रायफ्रूटसचे बारीक तुकडे करुन ठेवा.

५. एका पातेल्यात दूध घेऊन त्यामध्ये सब्जा, शेवया, गुलकंद आणि ड्रायफ्रूटसचे बारीक तुकेड घाला. 

६. हे मिश्रण फ्रिजमध्ये गार करायला ठेवा.

७. खायच्या वेळी फ्रिजमधून बाहेर काढल्यानंतर त्यावर गुलकंद आईस्क्रीम किंवा कुल्फीचे तुकडे घाला.

८. त्यावर रोज सिरप आणि आणखी गुलकंद, सुकामेवा घालून सजवा. आवडीनुसार यामध्ये जेली, टुटीफ्रूटी असे काहीही घालू शकतो.

९. गारेगार फालुदा खा. अशाप्रकारे मँगो, पिस्ता, चॉकलेट असे वेगवेगळ्या प्रकारचे फालुदे घरी करता येतात. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.समर स्पेशल