गुरुनानक जयंतीनिमित्त (Gurpurab celebration, Gurunanak Jayanti) 'लंगर की दाल' या पदार्थाची नेहमीच चर्चा होते. हा पदार्थ नेमका काय असतो आणि तो कसा तयार होतो, याची उत्सूकता अनेकांना आहे. कारण ज्यांनी कुणी लंगरमध्ये प्रसाद घेतला आहे, त्यांना सगळ्यांनाच हा पदार्थ खूप आवडतो. हा पदार्थ खासकरून लंगरच्या जेवणात मिळतो. आणि आता तर 'लंगर की दाल' या नावानेच तो ओळखला जातो (Langar ki Dal recipe). पण आता त्याच चवीची डाळ घरी करायची असेल तर ती कशी करावी, याविषयीची माहिती सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर तसेच शेफ रणवीर ब्रार यांनी शेअर केली आहे. (How to make langar ki dal at home?)
'लंगर की दाल' करण्याची रेसिपी
साहित्य
पाऊण कप काळी उडीद डाळ
अर्धा कप हरबरा डाळ
४ ते साडेचार कप पाणी
चवीनुसार तिखट, मीठ
केसांतून नुसता हात फिरवला तरी केस गळून येतात? 'ही' पावडर खाऊन बघा- १५ दिवसांत केस गळणं कमी
१ मध्यम आकाराचा टोमॅटो
२ मध्यम आकाराचे कांदे
१ टेबलस्पून लसूण- आलं पेस्ट
२ हिरव्या मिरच्या
फोडणीसाठी तूप, जिरे, हिंग
अर्धा टेबलस्पून गरम मसाला
३ ते ४ लवंग, वेलची
१ तेजपान
कृती
सगळ्यात आधी उडीद डाळ आणि हरबरा डाळ व्यवस्थित २ ते ३ वेळा धुवून घ्या.
यानंतर त्या दोन्ही डाळी ७ ते ८ तास भिजू द्या.
झाडाची पानं सुकली- सारखी गळतात? २ पदार्थ वापरून घरीच तयार करा औषध- झाडं होतील हिरवीगार
यानंतर कुकर गॅसवर तापायला ठेवा. कुकर तापलं की त्यात दोन्ही डाळी, पाणी, थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि १ टीस्पून तेल टाकून डाळ शिजवून घ्या.
डाळ शिजली की कढईमध्ये तेल तापायला ठेवा. तेल तापल्यानंतर त्यात हळद, थोडा गरम मसाला, तेजपान टाका. मसाला हलकासा परतून घ्या, पण तो जळणार नाही याकडे लक्ष द्या.
यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि आलं- लसूण पेस्ट टाकून परतून घ्या. त्याच वेळी हिरव्या मिरच्यांचे तुकडेही टाका.
आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं आणि त्यातून कांदा- टोमॅटोचा कच्चा वास निघून गेला की गरम मसाला, लाल तिखट टाका आणि त्यानंतर त्यात आपण शिजवून घेतलेली डाळ टाका.
मीठ लावून पेरू नेहमीच खाता, यावेळी करून पाहा खट्टा- मिठा पेरू शॉट- बघा चटपटीत रेसिपी
चवीनुसार मीठ टाकून डाळ व्यवस्थित हलवून घ्या. मंच आचेवर डाळ १५ ते २० मिनिटे शिजवून घ्या. गरज वाटल्यास आणखी पाणी टाका.
यानंतर गॅस बंद करा. आता या डाळीवर तुपाची फाेडणी टाका आणि कढईवर झाकण ठेवून द्या. ४ ते ५ मिनिटांनी मसाले सेट होऊ द्या आणि त्यानंतर गरमागरम 'लंगर की दाल' सर्व्ह करा. ही डाळ तुम्ही पोळी, भाकरी, भातासोबत खाऊ शकता.