गुरूपौर्णिमेचा (Guru Purnima 2022) सण प्रत्येक भारतीय कुटुंबात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. आषाढ महिन्याची पौर्णिमा विशेष असते. ती गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. गुरु पौर्णिमा हा सण आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरूंच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. गुरू पौर्णिमेच्या दिवशी खास नैवेद्य बनवून देवाला किंवा गुरूंना दाखवला जातो. पण ऑफिसच्या आणि घरच्या कामाच्या गडबडीत पटकन काय नैवेद्य बनवायचा ते सुचत नाही. (Naivedya recipe and Prasad recipes) म्हणूनच या लेखात तुम्हाला उपवासाचे पदार्थ सुचवणार आहोत. जेणेकरून तुम्ही गुरूपौर्णिमेला कमीत कमी साहित्यात, कमी वेळेत उत्तम प्रसादाचा नैवेद्य बनवू शकाल. (Quick and easy to make delectable Naivedya recipe and Prasad recipes ideas)
१) प्रसादाचा शिरा
प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी तुम्हाला दूध, साखर, रवा अशा ४- ५ पदार्थांची आवश्यकता असेल. सकाळी उठल्यानंतर देवपूजेनंतर तुम्ही प्रसादाचा शिरा नैवेद्य म्हणून दाखवू शकता.
२) खीर
तांदळाची किंवा रव्याची खीर बनवायला तुम्हाला जास्तवेळ लागणार नाही. आधी मऊ भात शिजवून घेऊन नंतर तुम्ही स्वादीष्ट खीर बनवू शकता. याशिवाय तूपात शेवया भाजून शेवयांची खीरही बनवून नैवेद्य दाखवू शकता.
३) गुलाबजाम
जर तुम्हाला बाहेरून आणलेला नैवेद्य दाखवायचा नसेल किंवा खीर, शिरा यापेक्षा काही वेगळा नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्ही घरीच माव्याचे किंवा ब्रेड गुलाबजाम बनवू शकता अगदी अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात गुलाबजाम बनवून तयार होतील.
४) बासुंदी
गॅसवर दूध आटवायला ठेवल्यानंतर तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. फक्त दुधात साखर ड्राय फ्रुट्स, चारोळी, वेलची पूड घातल्यानंतर नैवेद्यासाठी चविष्ट बासुंदी तयार होईल.
५) लाडू
पटकन होणारे रवा, गूळाचे किंवा खजूराचे लाडू तुम्ही नैवेद्याला दाखवू शकता. याशिवाय तुम्ही पुरी किंवा पुरणपोळी, दोन भाज्या, वरण भाताचा संपूर्ण स्वयंपाक करून एखाद्या गोड पदार्थासह नैवेद्य दाखवू शकता.