क्लस्टर बीन्स अर्थात गवारीच्या शेंगा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. त्यात अनेक प्रकारचे पौष्टीक घटक आढळतात. गवारीच्या शेंगामध्ये प्रथिने आणि फायबर समृद्ध प्रमाणात असतात. याशिवाय यात व्हिटामिन सी, व्हिटामिन ए, कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशियम हे उपयुक्त घटक देखील आढळतात.
गवारीच्या शेंग्याचे अनेक प्रकार केले जातात. पण बहुतांश घरांमध्ये गवारीच्या शेंग्याची भाजी केली जाते. जर आपल्या रोजची तिच गवारीच्या शेंग्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर, चटपटीत गवार फ्राय ही रेसिपी ट्राय करून पाहा. जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण ही रेसिपी ट्राय करून पाहू शकता. कमी साहित्यात ५ मिनिटात हा पदार्थ रेडी होतो(Guwaar Phali Fry - Cluster Beans Fry ).
चटपटीत गवार फ्राय करण्यासाठी लागणारं साहित्य
गवार
तेल
हळद
लाल तिखट
नारळ फोडून फ्रिजमध्ये ठेवण्याच्या 2 सोप्या ट्रिक, नारळ खराब होणार नाही, बुरशीही लागणार नाही
मीठ
कृती
सर्वप्रथम, कोवळ्या गवारीच्या दोन्ही बाजूने कडा मोडून घ्या. त्यानंतर गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्या. दुसरीकडे तवा गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यात गवारीच्या शेंगा घालून कोरडी भाजून घ्या. गवारीवर चट्टे येईपर्यंत भाजून घ्या. गवारीच्या शेंगा भाजून झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा तेल घालून भाजून घ्या.
चपात्या कडक-वातड होऊ नयेत म्हणून ४ टिप्स, सकाळी केलेल्या चपात्या रात्रीपर्यंत राहतील मऊ
त्यानंतर त्यात चिमुटभर हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत गवार फ्राय खाण्यासाठी रेडी.