Join us  

भात गचगचीत होतो कधी कोरडा फडफडीत? कुकर लावताना वापरा ३ ट्रिक्स, मऊ होईल भात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 11:58 AM

Hacks to Make Perfect Rice : तुम्ही तांदळात किती पाणी घालताय हे फार महत्वाचं असतं. प्रत्येकाची पाणी मोजण्याची पद्धत वेगवेगळी असते.

भात आणि तांदळापासून बनवलेले पदार्थ भारतातील प्रत्येक घरात खाल्ले जातात. कधी वरणभात, कधी खिचडी, खास प्रसंगाना पुलाव, बिर्याणी, दाळ खिचडी, टोमॅटो राईस, जिरा राईस, लेमन राईस असे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. (How to make rice non sticky perfect rice making tips) पदार्थ  कोणताही असला तरी भात व्यवस्थित मऊ, दाणेदार शिजला असेल तर खायला चांगला लागतो. भात बनवण्याच्या बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत. कुकरमध्ये भात शिजवल्यास पटकन होतो म्हणून अनेकदा भात करण्यासाठी कुकरचा वापर केला जातो.  भात कधी गचका होतो तर कधी जास्त करपतो. (Hacks to Make Perfect Rice)

 परफेक्ट भात बनवणं अगदी सोपं आहे. फक्त भात बनवण्याची योग्य टेक्निक माहित असायला हवी.  काही लोक त्यात पाणी जास्त घालतात. तर काही लोक पाणी खूप कमी घालतात. याव्यतिरिक्त तुम्ही भात कसा बनवताय हा मोठा फॅक्टर आहे.  जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये भात बनवत असाल तर काही टिप्स वर लक्ष द्या. जेणेकरून भाताचे टेक्स्चर बिघडणार नाही.

योग्य तांदळांची निवड करा

सगळ्यात आधी तुम्ही कोणत्या तांदळाची निवड करताय हे फार महत्वाचं असतं. जर तांदूळ लहान असतील  तर त्याचे दाणे नेहमीच चिकटतील. लांब तांदूळ कमी  चिकट होतात. जॅस्मीन किंवा बासमती तांदूळ  जास्त चिपचिपीत होत नाही.  कारण पांढऱ्या किंवा लहान दाण्यांच्या भातात स्टार्च जास्त असते. बासमती तांदळात स्टार्च कमी असते.

रोजच्या वरणाची चव वाढवणारी पाहा झणझणीत फोडणी, बदला नेहमीची पद्धत- करा ‘अशी’ फोडणी

भातात पाणी घालण्याची योग्य पद्धत

तुम्ही तांदळात किती पाणी घालताय हे फार महत्वाचं असतं. प्रत्येकाची पाणी मोजण्याची पद्धत वेगवेगळी असते.  काहीजण आपल्या बोटांनी पाण्याचा अंदाज घेताच तर काहीजण चमचा घालून मोजतात. नेहमी १ कप तांदळासाठी १.५ कप पाणी पुरेसं होतं.  जर तुम्ही मायक्रोव्हेव्ह किंवा ओव्हनमध्ये बनवत असाल तर पाण्याचे प्रमाण २ कप असेल.

पातळ पोह्याचा कुरकुरीत चिवडा करा कमी तेलात, पावसाळ्यातही पोहे आकसणार-सादळणार नाहीत

तांदूळ भिजवण्याची ट्रिक

याशिवाय तुम्ही तांदूळ पाण्यात किती वेळ भिजवताय हे सुद्धा महत्वाचं असतं. तांदूळ भिजवल्यामुळे तांदूळ शिजवण्यासाठी लागणारा वेळ कमी होतो. जर तुम्ही आधी भात भिजवला असेल तर पाण्याचे प्रमाण कमी करा. तांदळाची योग्य निवड केली नाही तांदूळ चिकट होऊ शकतो. लहान तांदळांमध्ये स्टार्च जास्त असते. बासमती  तांदळाच स्टार्च खूप कमी असते. 

मोकळा तांदूळ बनवण्यासाठी तुम्ही काही सोपे हॅक्स ट्राय करू  शकता.  सगळ्यात आधी एका पातेल्यात पाणी गरम करा. उकळ येईल तेव्हा भात घाला. २ ते ३ मिनिटांनंतर १ चमचा रिफाईंड तेल आणि १ चमचा लिंबाचा रस घाला. झाकण ठेवून ३ ते ४ मिनिटांसाठी शिजवून घ्या.

जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये तांदूळ शिजवत असाल तर हा हॅक तुमचं काम सोपं करेल. त्यासाठी सगळ्यात आधी प्रेशर कुकरला तूप लावून व्यवस्थित ग्रीस करून घ्या. त्यानंतर तांदूळ आणि पाणी घालून ३ शिट्ट्या काढा. हा उपाय केल्यास तांदूळ चिकटणार नाही.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न