Lokmat Sakhi >Food > रायतं आणि फुलांचं? हादग्याच्या फुलांचं? हे देखणं चविष्ट रायतं पावसाळ्यात एकदा खा, पुन्हा पुन्हा कराल....

रायतं आणि फुलांचं? हादग्याच्या फुलांचं? हे देखणं चविष्ट रायतं पावसाळ्यात एकदा खा, पुन्हा पुन्हा कराल....

काकडी, कांदा, मुळा, भोपळा यांचे रायते तुम्ही अनेकदा ऐकले असेल आणि चाखलेही असेल. पण फुलांचे आणि ते ही हादग्याच्या फुलांचे रायते, हा प्रकार अनेक जणींसाठी निश्चितच नविन आहे. सेस्बॅनिया ग्रँडिफ्लोरा या नावाने हे झाड ओळखले जाते. हे रायते अतिशय चवदार तर होतेच, पण ते आरोग्यासाठीही खूपच पौष्टिक असते. त्यामुळे एकदा चाखून बघायलाच हवे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 12:59 PM2021-07-01T12:59:09+5:302021-07-01T13:22:03+5:30

काकडी, कांदा, मुळा, भोपळा यांचे रायते तुम्ही अनेकदा ऐकले असेल आणि चाखलेही असेल. पण फुलांचे आणि ते ही हादग्याच्या फुलांचे रायते, हा प्रकार अनेक जणींसाठी निश्चितच नविन आहे. सेस्बॅनिया ग्रँडिफ्लोरा या नावाने हे झाड ओळखले जाते. हे रायते अतिशय चवदार तर होतेच, पण ते आरोग्यासाठीही खूपच पौष्टिक असते. त्यामुळे एकदा चाखून बघायलाच हवे..

Hadga, sesbania Grandiflora raita, yummy and delicious recipe, wild vegetable | रायतं आणि फुलांचं? हादग्याच्या फुलांचं? हे देखणं चविष्ट रायतं पावसाळ्यात एकदा खा, पुन्हा पुन्हा कराल....

रायतं आणि फुलांचं? हादग्याच्या फुलांचं? हे देखणं चविष्ट रायतं पावसाळ्यात एकदा खा, पुन्हा पुन्हा कराल....

Highlightsहादग्याचे झाड १५ ते ३० फुटांपर्यंत वाढते. त्याचे आयुष्यमान अवघे तीन ते चार वर्षे असते. हादग्याच्या झाडाला वर्षातून अनेक वेळा बहर येतो. ऑगस्ट ते डिसेंबर या काळात हे झाड विशेष फुललेले असते. 

हादगा किंवा अगस्ता ही रानभाजी कोकण आणि मराठवाड्यात विपूल प्रमाणात आढळून येते. त्याचबरोबर खान्देश  आणि  पश्चिम महाराष्ट्रातही हादग्याची भाजी उपलब्ध असते. सेस्बॅनिया ग्रँडिफ्लोरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या झाडांची फुले, शेंगा अतिशय पौष्टिक असतात. हादग्याच्या पिवळट पांढऱ्या रंगाच्या आकर्षक फुलांचे चवदार रायते बनविणे अतिशय सोपे आहे. तुम्ही तुमच्यासाठी तर ही डीश एकदा बनवाच पण पाहूणे येणार असतील, तेव्हाही हमखास बनवून पहा. हा नविन पण अतिशय चवदार पदार्थ खाऊन पाहूणेही आनंदून जातील. 

 

रायते बनविण्यासाठी लागणारे पदार्थ
हादग्याची फुले, दही, मीठ, जीरे, मोहरी, तेल, कोथिंबीर, लाल मिरची, चिमुटभर साखर.

कसे बनवायचे हादग्याच्या फुलांचे रायते
१. सगळ्यात आधी तर हादग्याची फुले व्यवस्थित निवडून एकदा धुवून घ्या.
२. हादग्याची फुले अतिशय नाजूक आणि तलम असतात. त्यामुळे ती वाफवल्यावर अगदीच कमी दिसू लागतात. म्हणून चार ते पाच जणांसाठी रायते बनवायचे असल्यास एखादा कटोरा भरून फुले घ्यावीत. 


३. फुले स्वच्छ धुतली की ती तशीच भिजत न ठेवता लगेच कुकरच्या डब्यात टाका. या डब्यात पुन्हा पाणी टाकू नये. फक्त कुकरच्या तळाशी असलेले पाणीच वाफ येण्यासाठी पुरेसे आहे. 
४. कुकरची एक शिटी झाली की लगेच गॅस बंद करावा.
५. यानंतर कुकर थंड झाल्यावर वाफवलेल्या फुलांमध्ये घट्ट आणि फेटलेले दही, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर टाकून हे मिश्रण हलवून घ्यावे. यानंतर वरून मोहरी, जीरे, हिंग आणि एखादी वाळलेली लाल मिरची टाकून खमंग फोडणी घातली की झाले रायते तयार..!

 

आरोग्यासाठीही पोषक आहे हादगा....
१. हादग्याच्या फुलांमध्ये आणि शेंगांमध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण भरपूर असते. 
२. कफ आणि वातदोष कमी करण्यासाठी हादग्याच्या फुलांपासून बनविलेले विविध पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.
३. मासिक पाळीतील अनियमितता तसेच पाळी संदर्भातील अनेक आजारांवर हादग्याचे पदार्थ खाणे प्रभावी ठरते. 
४. भूक न लागणे किंवा पचनाच्या समस्या सोडविण्यासाठीही हादगा खावा.
५. हादग्याच्या नियमित सेवनाने जुनाट सर्दीचा त्रासही कमी होतो.
६. हवामान बदलामुळे ताप आला असल्यास हादगा गुणकारी ठरतो.


 

Web Title: Hadga, sesbania Grandiflora raita, yummy and delicious recipe, wild vegetable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.