Join us

हनुमान जयंती : बुंदी न पाडता करा झटपट मोतीचूराचे लाडू, खास नैवेद्य - पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2025 17:49 IST

Hanuman Jayanti: Make Instant Motichoora Ladoo - See Recipe : प्रसादासाठी करा मस्त लाडू. विकतपेक्षा भारी मोतीचूराचा लाडू करा घरीच.

घरी काही सण असला की बरेचदा प्रसादासाठी आपण लाडू करतो. (Hanuman Jayanti: Make Instant Motichoora Ladoo - See Recipe)अनेक प्रकारचे लाडू भारतामध्ये केले जातात. त्यातील एक म्हणजे मोतीचूराचा लाडू. जिभेवर ठेवताच विरघळणारा हा लाडू फार लोकप्रिय आहे. हनुमान जयंतीला मोतीचूराचा लाडू प्रसाद म्हणून केला जातो. बुंदी पाडून लाडू करायचा म्हणजे फार कष्ट घ्यावे लागतात. म्हणून हा लाडू घरी करण्याचे आपण टाळतो. (Hanuman Jayanti: Make Instant Motichoora Ladoo - See Recipe)मात्र ही रेसिपी पाहिल्यावर लाडू कायम घरीच कराल. अगदीच सोपी आहे आणि लाडूही छान होतात.  

साहित्यबेसन, पाणी, तेल, साखर, वेलची, काजू

कृती१. एका खोलगट भांड्यामध्ये बेसनाचे पीठ घ्या. चांगले चाळून घ्या. त्यामध्ये पाणी घालून चांगली पेस्ट तयार करा. गुठळ्या राहू देऊ नका. पाण्यासारखी पातळ करू नका. जरा घट्टच राहू द्या. 

२. एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल व्यवस्थित तापल्यावर त्यामध्ये बेसनाच्या पीठाचे लांब लांब पट्टे सोडा.  जाड लगदा होणार नाही याची काळजी घ्या. एका चमच्यामध्ये मावेल एवढे पीठ एकावेळी सोडा. आकार कसा येतो ते पाहायची गरज नाही. फक्त जास्त जाड होणार नाही याची काळजी घ्या. 

३. व्यवस्थित तळून झाल्यावर बेसनाचे तुकडे बाजूला ठेवा. छान गार करुन घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे तुकडे टाका. त्याचा भुगा करुन घ्या. सगळे तुकडे व्यवस्थित वाटले जातील याची काळजी घ्या. सुकी पूड तयार करुन घ्या. 

४. एका पातेल्यामध्ये साखर घ्या. त्यामध्ये पाणी ओता आणि मग गॅसवर ठेवा. साखरेचा एक तारी पाक तयार करून घ्या. पाक जरा घट्ट व्हायला लागला की त्यामध्ये वेलची टाका. तुम्हाला जर रंग वापरायचा असेल, तर मग तो रंग ही वेलची बरोबरच पाकात टाका. 

५. आता एका परातीमध्ये बेसनाचे तयार केलेले सुके पीठ घ्या. त्यावर हळूहळू कोमट पाक ओता. सगळं छान मिक्स करुन घ्या. ते मिश्रण पूर्ण गार होण्याआधीच लाडू वळून घ्या. मस्त मऊ होतात. 

६. लाडू वळून झाल्यावर वरती काजूचा तुकडा लावा. दिसायला छान दिसतो. तसेच लाडूबरोबर काजूची चवही छान लागते.   

टॅग्स :हनुमान जयंतीअन्नपाककृती