Lokmat Sakhi >Food > रामनवमी स्पेशल : करा प्रसादाचा शिरा, ५ मिनिटांत होणारा शिरा खाऊनच वाटेल प्रसन्न

रामनवमी स्पेशल : करा प्रसादाचा शिरा, ५ मिनिटांत होणारा शिरा खाऊनच वाटेल प्रसन्न

Happy Ram Navami : आज रामनवमी निमित्त अनेकांच्या घरी गोडधोड पदार्थ नैवेद्यासाठी बनवले जातात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 12:17 PM2023-03-30T12:17:46+5:302023-03-30T12:32:26+5:30

Happy Ram Navami : आज रामनवमी निमित्त अनेकांच्या घरी गोडधोड पदार्थ नैवेद्यासाठी बनवले जातात.

Happy Ram Navami : Ram Navami special how to make prasadacha sheera | रामनवमी स्पेशल : करा प्रसादाचा शिरा, ५ मिनिटांत होणारा शिरा खाऊनच वाटेल प्रसन्न

रामनवमी स्पेशल : करा प्रसादाचा शिरा, ५ मिनिटांत होणारा शिरा खाऊनच वाटेल प्रसन्न

चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षातील नवमीला ‘रामनवमी’ असे म्हणतात.  या दिवशी दुपारी १२ वाजता मंदिरांत श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. पाळण्यात श्रीरामाची मूर्ती ठेवून पाळणा गायला जातो, कीर्तन होते. लोकांना सुंठ-साखरेचा प्रसाद वाटला जातो. (Ram Navami special how to make prasadacha sheera)

आज रामनवमी निमित्त अनेकांच्या घरी गोडधोड पदार्थ नैवेद्यासाठी बनवले जातात. पण काहीजणांना रोजचं जेवण किंवा नैवेद्यासाठी खास पदार्थ बनवण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही.  पण पटकन तयार होणार नैवेद्य दाखवला तरी जास्त वेळही जात नाही आणि छान पदार्थही तयार होतो. पटकन तयार होणारा प्रसादाचा शिरा तयार करण्याची सोपी रेसेपी पाहूया. (Ram Navmi Special How to make rawa sheera)

प्रसादाचा शीरा झटपट कसा करायचा?

१) हा शीरा बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात काजू, बदाम, पिस्ता, मनूका असे सर्व ड्रायफुट्स  गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. 

२) ड्रायफ्रुट्स तळून झाल्यानंतर अजून २ चमचे तूप घालून त्यात रवा घालून परतवून घ्या.  रवा छान भाजून  झाला की त्यात एक कप उकळतं पाणी घाला. रवा शिजल्यानंतर त्यात साखर घालून एकजीव करा.

३) रव्याचं मिश्रण व्यवस्थित सेट झाल्यानंतर त्यात वेलची पावडर, केशराचं पाणी आणि ड्रायफ्रुट्स घालून एकजीव करा. तयार आहे झटपट रव्याचा शीरा. 

४)  रव्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरूनही शीरा बनवू शकता.
 

Web Title: Happy Ram Navami : Ram Navami special how to make prasadacha sheera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.