Join us

हिवाळा संपण्यापूर्वी खायलाच हवी ओल्या हरबऱ्याची कचोरी, घ्या झटपट होणारी खमंग रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2025 17:23 IST

How To Make Harbara Kachori: या दिवसांत ओला हरबरा बाजारात भरपूर प्रमाणात मिळतो. त्यामुळेच ओल्या हरबऱ्याची कुरकुरीत कचोरी नक्की करून खा.. (olya harbaryachi kachori recipe in Marathi)

ठळक मुद्देकचोरी नेहमी मध्यम आचेवर तळाव्या. नाहीतर त्या मऊ पडतात.

हिवाळ्याचे दिवस म्हणजे खवय्यांसाठी खरोखरच पर्वणीचे असतात. कारण या दिवसांत भाजीपाला खूप ताजा असतो आणि भरपूर प्रमाणात मिळतो. त्याशिवाय या दिवसांत अन्न चांगलं अंगी लागतं. आता हिवाळा संपत आला आहे, पण या दिवसांत बाजारात ओला हरबरा भरपूर प्रमाणात आलेला असतो. ओला हरबरा नुसता खायलाही छान लागतो. त्याशिवाय तो परतून आणि भाजूनही आपण खाऊ शकतो. ओल्या हरबऱ्याची आमटी हा आणखी एक असाच झणझणीत बेत.. आता त्याच ओल्या हरबऱ्याची खमंग कचोरी करून पाहा (harbara kachori recipe). रेसिपी अतिशय सोपी आहे (how to make harbara kachori?) आणि शिवाय खूप पटापट होणारी..(olya harbaryachi kachori recipe in Marathi) 

ओल्या हरबऱ्याची कचोरी करण्याची रेसिपी

 

साहित्य

१ वाटी ओले हरबरे

अर्धी वाटी भिजलेली मुगडाळ

४ ते ५ हिरव्या मिरच्या

२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

पायऱ्या चढणे- उतरणे की चालणे? हृदयासाठी दोन्हीपैकी काय जास्त चांगलं? वाचा तज्ज्ञांचं मत

६ ते ८ लसूण पाकळ्या आणि एखादा इंच आल्याचा तुकडा

१ वाटी मैदा

१ टीस्पून ओवा

१ चमचा तूप

१ मध्यम आकाराचा कांदा

चवीनुसार मीठ आणि  तळण्यासाठी तेल

 

कृती 

सगळ्यात आधी मुगडाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून एखादा तास भिजवून घ्या.

तळपायाच्या भेगा कमी होतच नाहीत? 'हा' घरगुती उपाय करा- २ दिवसांत पाय होतील मऊ- मुलायम 

त्यानंतर एका भांड्यात मैदा आणि ओवा घ्या. त्यात तूप कोमट करून टाका. तूप आणि मैदा व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर हळूहळू पाणी घालून मैदा थोडा घट्ट मळून घ्या. त्यानंतर १५ मिनिटांसाठी तो झाकून ठेवा.

पीठ मळून ठेवून दिल्यानंतर कचोरीमध्ये भरण्यासाठी सारण तयार करा. त्यासाठी ओले हरबरे, मिरच्या, आलं, लसूण हे सगळं मिक्सरमध्ये घालून जाडंभरडं वाटून घ्या.

 

त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये तेल घाला. तेल तापल्यानंतर कांदा परतून घ्या. कांदा परतून झाल्यानंतर मिक्सरमधलं वाटण कढईमध्ये घालून परतून घ्या. त्यावेळी त्यामध्ये मीठ, जिरेपूड, धणेपूड, कोथिंबीर, लिंबाचा रस असंही घालू शकता.  हे वाटण थोडं कोमट होऊ द्या.

रोज ब्रश करूनही तोंडाचा घाण वास जात नाही? ५ पदार्थ खा, तोंडाची दुर्गंधी कमी होईल

आता भिजवलेल्या मैद्याचा एक छोटासा गोळा घ्या आणि हातानेच तो थोडा पसरवून घ्या. तुम्ही यासाठी पोळपाट लाटणंसुद्धा वापरू शकता. आता त्यामध्ये तयार केलेलं सारण घाला आणि ती मैद्याची पुरी सगळीकडून व्यवस्थित बंद करून घ्या.

कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा आणि त्यात तयार केलेल्या कचोरी तळून घ्या. कचोरी नेहमी मध्यम आचेवर तळाव्या. नाहीतर त्या मऊ पडतात.

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.हिवाळ्यातला आहार