Join us  

हरितालिका उपवास: साबुदाणे वडे परफेक्ट जमत नाही? तेलात टाकताच फुटतात? घ्या खमंग - खुसखुशीत वडे रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2022 5:38 PM

Sabudana Vada Recipe: हरितालिकेच्या उपवासासाठी (Haritalika Fast) साबुदाणा वडा करण्याचा विचार असेल तर ही बघा एक परफेक्ट रेसिपी. वडे होतील खुसखुशीत, क्रिस्पी, चवदार.(How to make crispy, delicious sabudana vada?)

ठळक मुद्देपीठ हातावर घेऊन जेव्हा वडा तयार करतो, तेव्हा थोडा दाब देऊन तो एकजीव, घट्ट करावा. खूपच अलगद वळलेला वडा हमखास फुटतो. 

साबुदाणा वडा अनेकांचा आवडीचा. साबुदाण्याच्या खिचडीपेक्षाही अनेकांना साबुदाण्याचे वडे जास्त आवडतात. म्हणूनच बहुतांश घरांमध्ये उपवासाच्या दिवशी हमखास साबुदाणा वडा (How to make sabudana vada perfectly) करण्याचा घाट घातला जातो. त्यामुळे मग वडे खाऊन उपवास करणे आणि न करणारे असे दोघेही खुश होतात. आता बऱ्याच जणींना वडे करताना येणारी एक मुख्य अडचण म्हणजे वडा कढईत घातला की तो फुटतो. कधी कधी एकदम अंगावरही उडतो. चटका बसतो, तो त्रास तर होतोच. पण कढईत सगळं सारण पसरतं आणि मग तेल खराब होऊन सगळाच पसारा होऊन जातो. म्हणूनच वडा फुटू नये आणि तो चवदार, खुसखुशीत व्हावा, यासाठी बघा ही खास रेसिपी (Sabudana vada recipe). 

 

साबुदाणा वडा रेसिपीसाहित्यरात्रभर किंवा ७ ते ८ तास चांगला भिजलेला २ वाट्या साबुदाणा, २ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, २ ते ३ हिरव्या मिरच्या, थोडीशी साखर, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी दाण्याचा कूट, तळण्यासाठी तेल, गरज वाटत असल्यास लाल तिखट.

उकडीचे मोदक करताना फाटतात? सारण बाहेर येऊन मोदक फुटू नये म्हणून ५ टिप्स आणि खास रेसिपी 

रेसिपी१. उकडलेल्या बटाट्याची सालं काढून ते किसून एकजीव करून घ्या.२. यानंतर त्यात साबुदाणा आणि इतर सगळं साहित्य टाकून मिश्रण एकजीव करून घ्या.३. हाताला थोडं तेल लावून मिश्रणाचे छोटे छोटे वडे तयार करून घ्या आणि कढईत तापत असलेल्या गरम तेलात टाकून तळून घ्या. ४. लालसर रंगाचा तळून झाला की वडा कढईतून बाहेर काढा. 

 

तेलात टाकताच साबुदाणे वडे का फुटतात?१. साबुदाणा चांगला भिजला नसेल तर वडा फुटतो. त्यामुळे कमीतकमी ७ तास तरी साबुदाणा भिजलाच पाहिजे.२. साबुदाणा आणि बटाटा यांचं प्रमाण योग्य जमून आलं नाही, साबुदाण्याचं प्रमाण जास्त झालं तरी वडा फुटतो. त्यामुळे मिश्रण अशा पद्धतीने तयार करा की साबुदाणा खूप मोकळा- मोकळा सुटणार नाही. कालवल्यानंतर मिश्रण व्यवस्थित एकजीव होईल.

३. मिश्रण जर हाताला खूपच चिकट लागत असेल तर बटाटा जास्त झाला आहे, हे समजावं. अशा चिकट मिश्रणाच्या पीठाला तेल खूप लागतं.४. पीठ हातावर घेऊन जेव्हा वडा तयार करतो, तेव्हा थोडा दाब देऊन तो एकजीव, घट्ट करावा. खूपच अलगद वळलेला वडा हमखास फुटतो. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.