Lokmat Sakhi >Food > ऐन तारुण्यात हाडं कडकड वाजतात? करा पौष्टीक लाडू-प्रोटीन मिळेल भरपूर आणि हाडंही होतील बळकट

ऐन तारुण्यात हाडं कडकड वाजतात? करा पौष्टीक लाडू-प्रोटीन मिळेल भरपूर आणि हाडंही होतील बळकट

Have This Protein And Vitamin Ladoo Every Day For Healthy Bones : गुडघेदुखी विसराल - केसही होतील दाट; फक्त 'हा' १ लाडू रोज खा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2024 05:19 PM2024-10-04T17:19:59+5:302024-10-04T20:11:47+5:30

Have This Protein And Vitamin Ladoo Every Day For Healthy Bones : गुडघेदुखी विसराल - केसही होतील दाट; फक्त 'हा' १ लाडू रोज खा

Have This Protein And Vitamin Ladoo Every Day For Healthy Bones | ऐन तारुण्यात हाडं कडकड वाजतात? करा पौष्टीक लाडू-प्रोटीन मिळेल भरपूर आणि हाडंही होतील बळकट

ऐन तारुण्यात हाडं कडकड वाजतात? करा पौष्टीक लाडू-प्रोटीन मिळेल भरपूर आणि हाडंही होतील बळकट

प्रोटीन (Protein) हे एक मायक्रोन्‍यूट्रिएंट आहे (Protien Rich Laddoo). जे लहानग्यांपासून वृद्धापर्यंत सर्वांनाच गरज असते. शरीराच्या उत्तम वाढीसाठी प्रोटीन आवश्यक आहे (Health Tips). प्रथिने केवळ स्नायूंसाठी आवश्यक नसून केस, डोळे आणि आपल्या हार्मोन्सच्या कार्यासाठी देखील आवश्यक मानले जाते (Bone Health).

नियमित व्यायाम करणाऱ्या लोकांना प्रोटीनची पुरेपूर गरज भासते. शरीरातील प्रोटीनची गरज भागवण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे पावडर मिळतात. पण याचा खर्च भरपूर असते. जर शरीरातील प्रोटीनची गरज भागवायची असेल तर, चण्याचा प्रोटीन रिच लाडू तयार करा. स्वस्तात मस्त हे लाडू झटपट तयार होतात. शिवाय हा लाडू तयार करण्यासाठी खर्च किंवा जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही. आपण एक लाडू खाऊनही उर्जा मिळवू शकता(Have This Protein And Vitamin Ladoo Every Day For Healthy Bones).

प्रोटीन रिच लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

भाजलेले चणे

बदाम

गुळ

मखाणा

या पद्धतीने करा प्रोटीन रिच लाडू


सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात एक कप भाजलेले चणे घ्या. त्यात एक कप बदाम, मखाणा घालून बारीक पावडर तयार करा. 
आता गॅसवर पॅन गरम कऱण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे तूप घाला. तूप विरघळल्यानंतर त्यात तयार चणे आणि ड्रायफ्रुट्सची पावडर घालून भाजून घ्या. भाजलेली पावडर एका परातीमध्ये काढून घ्या.

मोबाइल दाखवला नाही तर मुलं जेवतच नाहीत? तज्ज्ञ सांगतात ३ गोष्टी, मोबाइल पाहण्याची सवय सुटेल चटकन

दुसरीकडे एक भांडं गरम करण्यासाठी ठेवा. त्यात पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात गुळ घालून पाक तयार करा. तयार पाक भाजलेल्या पावडरमध्ये घालून चमच्याने मिक्स करा.

नंतर त्यात चमचाभर वेलची पूड घालून हाताने मिश्रण एकजीव करा. साहित्य गरम असतानाच हाताला थोडे तूप लावून लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे आपले पौष्टीक प्रोटीन रिच लाडू खाण्यासाठी रेडी.

भाजलेले चणे खाण्याचे फायदे

भाजलेल्या चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आर्यन आणि व्हिटामिन असते. ज्यामुळे आपल्याला दिवसभर उत्साही वाटते. शिवाय उर्जाही मिळते.

बदाम

बदाम खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. बदामामध्ये प्रथिने, अँटी-ऑक्सिडंट्सही असतात. शिवाय कॅलरीचं प्रमाण कमी असतं. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी बदाम खाणे फायद्याचे ठरते. त्यामुळे बरेच तज्ज्ञ बदाम खाण्याचा सल्ला देतात.

पिंपल्स - मुरुमांचे डाग घालवण्यासाठी रोज रात्री लावा १ खास तेल; चेहरा दिसेल काचेसारखा

मखाणा

मखाणा हे पोषक तत्वांचे भांडार मानले जाते. कारण यामध्ये  प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह मोठ्या प्रमाणात असते. रोज मखाणा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आपण रोजच्या आहारात मखाण्याचा समावेश करू शकता. यामुळे हाडांना बळकटी मिळेल. 

Web Title: Have This Protein And Vitamin Ladoo Every Day For Healthy Bones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.