Lokmat Sakhi >Food > रोस्टेड चीझी तंदुरी कॉर्न खाल्ला का ? खाऊन तर बघा... एक बार खाओगे तो...

रोस्टेड चीझी तंदुरी कॉर्न खाल्ला का ? खाऊन तर बघा... एक बार खाओगे तो...

Roasted Cheesy Tandoori Corns : भाजलेल्या मक्यावर छान लाल तिखट, मीठ, लिंबू लावून चव घेत खाणे याहून मोठे सुख: नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2022 01:41 PM2022-12-22T13:41:03+5:302022-12-22T13:46:24+5:30

Roasted Cheesy Tandoori Corns : भाजलेल्या मक्यावर छान लाल तिखट, मीठ, लिंबू लावून चव घेत खाणे याहून मोठे सुख: नाही.

Have you eat Roasted Cheesy Tandoori Corn? | रोस्टेड चीझी तंदुरी कॉर्न खाल्ला का ? खाऊन तर बघा... एक बार खाओगे तो...

रोस्टेड चीझी तंदुरी कॉर्न खाल्ला का ? खाऊन तर बघा... एक बार खाओगे तो...

हिवाळ्यात आणि पावसाळ्यात गरमागरम मका भाजून खाण्याची मज्जा काही औरच असते. भाजलेल्या मक्यावर छान लाल तिखट, मीठ, लिंबू लावून चव घेत खाणे याहून मोठे सुख: नाही. मका हा तसा सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ आहे. भाजलेलं मक्याचे कणीस, उकडलेला मका हे आपण आवडीने खातो. मका अत्यंत पौष्टीक असून त्यात फायबर्स अधिक प्रमाणात असतात. नाश्त्यामध्ये अनेक वेळा आपण मक्यापासून तयार करण्यात आलेले विविध पदार्थ खातो. आपल्याकडे कॉर्न पॅटिस, कॉर्न सूप, कॉर्न भेळ, कॉर्न पुलाव असे वेगवेगळे पदार्थ कॉर्न पासून तयार केले जातात. सध्या बाजारात असणारी हिरवट-पिवळसर सालं असलेली मक्याची कणसं अनेकांची लक्ष वेधून घेतात. या मक्याच्या कणसापासून आपण छान रोस्टेड चीझी तंदुरी कॉर्न बनवू शकतो. रोस्टेड चीझी तंदुरी कॉर्नची रेसिपी काय आहे ते शिकून घेऊ. meghna’sfoodmagicया इन्स्टाग्राम पेजवरून रोस्टेड चीझी तंदुरी कॉर्नची रेसिपी शेअर करण्यात आली आहे (Roasted Cheesy Tandoori Corns).

 

साहित्य - 

१. मका - १
२. चीझ स्प्रेड - १ टेबलस्पून 
३. तंदुरी मसाला किंवा टिक्का मसाला  - १ टेबलस्पून 
४. लाल तिखट - १/२ टेबलस्पून 
५. हळद - चिमूटभर 
६. कोथिंबीर - १ टेबलस्पून 
७. लिंबाचा रस - १ टेबलस्पून 
८. चीझ क्यूब - १
९. मीठ - चवीनुसार 
१०. मिरची - १ (बारीक चिरलेली) 

कृती - 

१. मक्याची साल काढून तो स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मका आवडीनुसार खरपूस भाजून घ्या. 
२. एका बाऊलमध्ये चीझ स्प्रेड घेऊन त्यामध्ये तंदुरी मसाला किंवा टिक्का मसाला, लाल तिखट, हळद, कोथिंबीर, लिंबाचा रस, मीठ, मिरची, घालून घ्या. हे मिश्रण चमच्याने एकत्रित करून घ्या. 
३. हे तयार झालेले मिश्रण भाजलेल्या मक्यावर लावून घ्या. 
४. हा मका एका प्लेटमध्ये घेऊन त्यावर चीझ किसून घाला थोडीशी कोथिंबीर आणि तंदुरी मसाला भुरभुरून सर्व्ह करा.   

तुमचा रोस्टेड चीझी तंदुरी कॉर्न खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: Have you eat Roasted Cheesy Tandoori Corn?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.