Join us

कोकणातली अस्सल पारंपरिक चवीची ‘वाटपाची डाळ’ खा, उन्हाळ्यात जेवा दोन घास जास्त! पाहा चविष्ट रेसिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2025 18:19 IST

Have you ever eaten this dal? No? Then you must try it, see the recipe : वाटपाची डाळ म्हणजे चमचमीत पदार्थ. तयार करायला अगदीच सोपी.

भारतीय पाककलेमध्ये अनेक अशा रेसिपी आहेत, ज्या अगदी साध्यासुध्या आहेत . मात्र चवीला अगदी लाजवाब असतात. (Have you ever eaten this dal? No? Then you must try it, see the recipe)आपल्या रोजच्या आहारामध्ये भाजी, पोळी, आमटी, भाताचा समावेश असतो. भात, पोळी जरी सारखेच असले तरी भाजी व आमटी आपण वेगवेगळ्या पद्धतीची तयार करतो. आमटी तयार करताना वेगवेगळ्या डाळींचा वापर करतो. त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फोडण्या देतो. (Have you ever eaten this dal? No? Then you must try it, see the recipe)त्यामध्ये भाज्यांचा वापर करून वेगळी आमटीही तयार करतो. अशीच एक पारंपारिक रेसिपी आहे, मात्र आमटी नाही तर वरण असे म्हणण्याची पद्धत आहे. 

वाटपाचे वरण हे कोकणातील गावोगावी तयार केले जाते. तयार करायला अगदीच सोपे आहे. एकदा का डाळ शिजली की पुढे अगदी १५ मिनिटांचे काम आहे. 

साहित्य ओलं खोबरं, कोथिंबीर, जिरं, कांदा, हिरवी मिरची, तेल, मोहरी, कडीपत्ता, हिंग, हळद, तुरीची डाळ, पाणी, मीठ

कृती१. तुरीची डाळ शिजवून घ्यायची. जरा जास्त पातळ करून घ्यायची. 

२. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेला कांदा घ्या. त्यामध्ये जिरं घाला. हिरव्या मिरचीचे तुकडे करून त्यामध्ये घाला. कोथिंबीरही चिरून घ्या. ओले खोबरेही घ्या. वाटण तयार करण्यापुरते पाणी वापरा. ते सगळं छान वाटून घ्या. आपलं वाटण तयार आहे.  

३. एका कढईमध्ये तेल घ्या. तेल जरा गरम झाले की त्यामध्ये मोहरी टाका. ती छान तडतडू द्या. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कडीपत्याची पाने घाला. कडीपत्याचा वास अगदी छान येतो. त्यामध्ये थोडे हिंग घाला. हळद घाला.  

४. फोडणी छान परतली गेली की त्यामध्ये तयार केलेले वाटण घाला. वाटण जरा पाच मिनिटे छान परतून घ्या. ते खमंग परतले गेले की मग त्यामध्ये थोडे पाणी घाला आणि ते झाकून ठेवा . मस्त उकळून घ्या. 

५. वाटण उकळले की त्यामध्ये शिजवलेली तुरडाळ घाला. गरजे एवढे पाणी वापरा आणि ते वरण छान उकळून घ्या. गरमा गरम भातावर हे वरण घ्या, त्यावरती छान तुपाची धार सोडा.    

टॅग्स :अन्नकोकणआहार योजनापाककृती