तांबडा-पांढरा रस्सा महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र हा प्रकार मांसाहारी असल्याने तो सगळ्यांना खाता येत नाही. मांसाहारी पदार्थांऐवजी त्यांचे शाकाहारी वर्जन असलेल्या अनेक रेसिपी असतात. तशीच एक रेसिपी म्हणजे व्हेज पांढरा रस्सा. (Have you ever eaten veg pandhra rassa? A mouth-watering recipe, scrumptious and delicious)तयार करायला जरा वेळ लागतो मात्र चव अगदीच लाजवाब असते. सामग्रीही काही फार वेगळी वापरायची नाही. घरात उपलब्ध असलेल्याच पदार्थांच्या वापर करायचा आहे.
साहित्य
मसूर डाळ, पाणी, मीठ, काजू, नारळ, तेल, तूप, तमालपत्र, चक्रफुल, वेलची, दालचिनी, काळीमिरी, लवंग, हिरवी मिरची, कांदा, आले, लसूण, खसखस(Have you ever eaten veg pandhra rassa? A mouth-watering recipe, scrumptious and delicious)
कृती
१. मसूर डाळ स्वच्छ धुऊन घ्या. नंतर ती रात्रभर पाण्यामध्ये भिजत घाला. सकाळी ते पाणी बदलून घ्या. एका कुकरमध्ये थोडं मीठ घ्या. डाळ शिजेल एवढं पाणी घ्या. कुकर लावा आणि डाळ छान शिजू द्या.
२. डाळ शिजली की ती स्मॅशरने पातळ करून घ्या. अगदी मऊ होईपर्यंत शिजवायची. स्मॅश करून झाल्यावर त्यामध्ये थोडे पाणी घाला. मोठ्या गाळणीचा वापर करून त्यामधून डाळ गाळून घ्या. पूर्ण रस निघेपर्यंत थोडे-थोडे पाणी घालून डाळ चमच्याने दाबून रस काढा. मग चोथा बाजूला करा.
३. एका वाटीमध्ये काजू व खसखस भिजत ठेवा. ५ मिनिटांसाठी भिजवलेत तरी पुरेसे आहे. नंतर त्याची पेस्ट तयार करून घ्या. अति पातळ करू नका.
४. एक नारळ फोडून घ्या. त्याचे तुकडे करा आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला. त्यामध्ये पाणी घाला. जेवढा नारळ तेवढंच पाणी वापरा. सगळं मिश्रण पातळ आणि एकजीव होईपर्यंत मिक्सरमधून फिरवून घ्या. नंतर एका स्वच्छ फडक्याचा वापर करून नारळाचे दूध काढून घ्या.
५. कढईमध्ये तेल घ्या. त्यामध्ये थोडे तूपही टाका. जरा गरम झाले की तमालपत्र, चक्रफुल, वेलची, दालचिनी, काळीमिरी, लवंग हे सगळे खडे मसाले त्यावर परता. त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट घाला. ती ही परतून घ्या. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला. सगळं पाच मिनिटे परता. हिरवी मिरचीही घाला.
६. छान परतून झाल्यावर त्यामध्ये डाळीचा रस्सा घाला. तसेच काजूची पेस्टही घाला. नारळाचे तयार केलेले दूध घाला. सगळं छान ढवळून घ्या. मग त्यावरती झाकण ठेवा आणि वाफ काढून घ्या. चवीनुसार मीठ घाला.