वाढत चालेलं वय रोखता येत नाही. मात्र, आपण ते चेहऱ्यावर दिसण्यापासून रोखू शकतो. वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर मुरूम, सुरकुत्या येणे सामान्य बाब आहे. आपण हे रोखण्यासाठी अनेक महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतो. काहींना हे प्रोडक्ट्स सूट करतात तर काहींना नाही. केमिकलयुक्त प्रोडक्ट्स आपल्या चेहऱ्यासाठी दुष्परिणाम ठरतात. महागड्या प्रोडक्ट्सचा वापर न करता आपण घरगुती उपायांचा वापर करून आपल्या चेहऱ्याची निगा राखू शकता. आज आपण अशा ड्रिंक बद्दल जाणून घेणार आहोत ज्याने आपली त्वचा तुकतुकीत आणि तजेलदार दिसेल. डाळिंबाचे दाणे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. आपण त्याचे साल फेकून देतो. मात्र, ते साल फेकून न देता एक पेय तयार करून सेवन करू शकतो.
डाळिंबाच्या सालीपासून सुपर ड्रिंक
या पेयसाठी लागणारं साहित्य
डाळिंब
५ ते ७ तुळशीचे पानं
पुदिना
संत्र्याचे २ ते ३ काप
१ ग्लास गरम पाणी
एक चमचा मध
कृती
सर्वप्रथम एक डाळिंब घ्या. डाळिंबाचे दाणे आणि साली वेगवेगळे करा. यानंतर डाळिंबाचे दाणे, तुळशीचे पानं, आणि पुदिना मिक्सरमधून वाटून घ्या. एका भांड्यात मिक्समधून वाटलेलं मिश्रण आणि डाळिंबाचे बारीक काप केलेले सालं एकत्र करा. आता त्यात एक ग्लास गरम पाणी टाका. नंतर संत्र्याचे बारीक काप करून टाका. आणि सर्व मिश्रण एकत्र करा.
मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवा. १५ मिनिटे झाल्यानंतर चाळणीने तयार मिश्रणाचे पाणी वेगळे करा. अशाप्रकारे डाळिंबाच्या सालीपासून सुपर ड्रिंक तयार. त्वचा उजळ आणि चमकदार बनवण्यासाठी हे पेय मदतगार ठरेल. उत्तम रिझल्टसाठी महिन्यातून ४ वेळा तरी हे पेय प्यावे.