तुम्हाला असं वाटतं की आपण अगदीच बोअर काहीतरी खातो रोज? तेच ते. भाजीपोळीवरणभात. त्याच त्या टिपीकल भाज्या. काहीच एक्झॉटिक नाही. आपले मित्रमैत्रिणी रोज कसले भारी पदार्थ खातात. ब्रार पासून दलाल पर्यंत रोज एकसेएक शेफ कसले भन्नाट पदार्थ इन्स्टावर टाकतात. आणि आपण काय बटाट्याचा रस्ता आणि पोळी खात ते पाहतो. आपल्या आयुष्यात काही फूड जॉयच नाही. आपण फार बोअर आहोत...
असं बरंच काही तुम्हाला वाटतं का? आपणही चमचमीत खावं, त्या डिशचे फोटो सोशल मीडियात टाकून लोकांकडून वॉव घ्यावे.
विचार करा असे कशाने होते? सकाळी तुम्ही फोन हातात घेतला की जवळच असलेल्या एखाद्या हॉटेलची जाहिरात दिसते. किंवा मग एखाद्या मैत्रिणीचं स्टेटस अबाऊट लास्ट नाइट, मित्राच्या पार्टीचे फोटो, कुणीतरी ग्रूपवर टाकलेली क्रिएटिव्ह रेसिपी.
ते नको म्हणून तुम्ही इंस्टाग्रामवर गेलात तर अन्नपदार्थांच्या कितीतरी पोस्ट, व्हिडिओ बघायला मिळतात. त्यातही झटपट, सोपे, तळलेले, इझी टू मेक असे बरेच पदार्थ. चमचमीत जंक जास्त.
पण हे असं सतत झाल्याने तुमचे वजनही वाढते आहे आणि घरचं अन्न खाण्यातला तुमचा इंटरेस्टही कमी होतो आहे.
(Image : Google)
बघा तुमचं असं काही होतंय का?
१. सतत काहीतरी मस्त चमचमीत खावं असं तुम्हाला वाटतं का? आपलं रोजचं जेवण बोअर आहे असं वाटतं का?
२. खाण्यापेक्षा पदार्थांचे फोटो काढण्यात तुमचा रस जास्त वाढला आहे का?
३. तुम्ही आपण पार्टी परसन का नाही असं म्हणत मनात झुरता का?
४. आपल्या जगण्याविषयी तुमचं असमाधान वाढलं आहे का?
५. तुम्हाला स्वयंपाक येत असेल किंवा नसेलही पण आपले पदार्थ बाेअर, बाकी अन्य पदार्थ भारी असं तुमच्याही नकळत तुम्हाला वाटतं का?
६. स्ट्रेस इटिंग वाढलं आहे का?
७. तुमचं वजन वाढलं आहे का?
८. तुमचं बाहेरचं खाणं वाढलं आहे का?
९. तुम्ही इतरांचे फूड स्टेटस सतत चेक करुन त्यांचा विचार करता का?
१० अन्नाचा आदर करणं तर कमी झालेलं नाही?