Join us  

रोजच्या भाकरीला द्या नवा ट्विस्ट, कधी पौष्टीक मसाला भाकरी ट्राय करून पाहिली आहे का? टिफिनसाठीही बेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2024 10:00 AM

Have you ever tried Masala Bhakri?, check out easy and healthy recipe : मुलांच्या डब्यात द्या पौष्टिक मसाला भाकरी..

भाकरी हा महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीचा महत्त्वाचा पदार्थ आहे (Masala Bhakri). भाकरीबरोबर ठेचा, भाजी, झुणका, पिठलं भारी लागतं. भाकरी अनेक प्रकारच्या पिठापासून तयार केली जाते (Cooking Tips). पण भाकरी केल्यानंतर भाजी ही लागतेच. फक्त भाकरीला चव नसते. पण जर आपल्याला भाजी बनवण्याचा कंटाळा आला असेल तर, आपण  मसाला भाकरीही करून पाहू शकता (Food).

आपण कधी मसाला भाकरी करून पाहिली आहे का? झटपट होणारी मसाला भाकरी चवीला अत्यंत स्वादिष्ट आणि बनवायला अतिशय सोपी आहे. आपण ही मसाला भाकरी मुलांना टिफिनसाठीही देऊ शकता. मसाला भाकरी नेमकी बनवायची कशी? पाहूयात(Have you ever tried Masala Bhakri?, check out easy and healthy recipe).

मसाला भाकरी करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदुळाचं पीठ

मीठ

ज्वारीचे आप्पे करा फक्त १५ मिनिटांत, गुबगुबीत ग्लूटन फ्री आप्पे-नाश्त्याला बेस्ट-शाळेच्या डब्यासाठीही मस्त

चिली फ्लेक्स

कोथिंबीर

तूप

कृती

एक भांडं गरम करण्यासाठी ठेवा. त्यात पाणी घाला. पाणी गरम झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तांदुळाचं पीठ घालून मिक्स करा. तांदुळाचं पीठ घालताना लाटण्याने मिक्स करत राहा. जेणेकरून पिठाच्या गुठळ्या होणार नाही.

गव्हाची पोळी आणि प्रोटीनरिच? कणकेत मिसळा १ खास पदार्थ, पोळी खाऊनही घटेल वजन

उकड तयार झाल्यानंतर गॅस बंद करा, आणि उकड एका परातीत काढून घ्या. हाताला थोडे पाणी लावा, आणि पीठ २ - ३ मिनिटांसाठी मळून घ्या. दुसरीकडे लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवा.

परातीवर थोडे पीठ शिंपडा. एक गोळा घ्या आणि भाकरी थापून घ्या. भाकरी थापायला जमत नसेल तर, लाटूनही आपण  भाकरी तयार करू शकता. तवा गरम झाल्यानंतर त्यावर एक चमचा ब्रशने तूप लावा. नंतर भाकरी पसरवा, व दोन्ही बाजूने भाजून घ्या. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स