Lokmat Sakhi >Food > उपवासाची झणझणीत कढी कधी करून पाहिली का? अगदी १० मिनिटात करा कढी - खा पोटभर

उपवासाची झणझणीत कढी कधी करून पाहिली का? अगदी १० मिनिटात करा कढी - खा पोटभर

Have you ever tried Upwasachi Kadhi recipe; check out instant Recipe : आंबट - तिखट चवीची उपवासाची कढी एकदा करून पाहाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2024 06:39 PM2024-10-08T18:39:31+5:302024-10-08T18:40:40+5:30

Have you ever tried Upwasachi Kadhi recipe; check out instant Recipe : आंबट - तिखट चवीची उपवासाची कढी एकदा करून पाहाच

Have you ever tried Upwasachi Kadhi recipe; check out instant Recipe | उपवासाची झणझणीत कढी कधी करून पाहिली का? अगदी १० मिनिटात करा कढी - खा पोटभर

उपवासाची झणझणीत कढी कधी करून पाहिली का? अगदी १० मिनिटात करा कढी - खा पोटभर

नवरात्र म्हटलं की नऊ देवींचा जागर (Navratri 2024). या नऊ दिवसात दांडिया - गरबाही खेळण्यात येतो (Garba-Dandiya). शिवाय काही महिलावर्ग उपवासही धरतात (Fasting recipe). उपवासाला महिला साबुदाणा, भगर किंवा फळे खातात. साबुदाणा खिचडी ही कॉमन आहे. शिवाय साबुदाणा वडेही केले जातात.

काही घरांमध्ये भगरचा भात केला जातो. भगरसोबत शेंगदाण्याची चटणीही (Shengdanyachi Chutney) केली जाते. पण शेंगदाण्याची चटणीही खाऊन कंटाळा येतो. जर आपल्याला साबुदाण्याचे वडे, भगरच्या भातासोबत काहीतरी वेगळं खायचं असेल तर, उपवासाची कढी करून पाहा. चटपटीत ही कढी आपल्याला नक्कीच आवडेल. उपवासाची कढी नेमकी बनवायची कशी? पाहा सोपी रेसिपी(Have you ever tried Upwasachi Kadhi recipe; check out instant Recipe).

उपवासाची कढी करण्यासाठी लागणारं साहित्य


राजगिऱ्याचे पीठ

दही

हिरवी मिरची

मीठ

जिरं

बार्बी डॉल आता झाली भारतीय, दिवाळी साजरी करणारी ही भारतीय बार्बी पाहिली का?

पाणी

बटाटा

कृती

वरईचा भात

सर्वात आधी एक भांडं गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे तेल घाला. नंतर त्यात एक चमचा जिरं, एक ग्लास पाणी, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. पाण्याला उकळी फुटल्यानंतर त्यात भाजलेली भगर घाला, आणि त्यावर झाकण ठेवा. भात व्यवस्थित शिजेल. आणि भगरचा भट तयार होईल.

उपवासाची भजी

आता कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. त्यात कढीमध्ये घालण्यासाठी भजी तळून घ्यायचे आहेत. यासाठी एका बाऊलमध्ये राजगिऱ्याचे पीठ घ्या. त्यात चमचाभर दही, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरं, मीठ, आणि थोडं पाणी बॅटर तयार करा. त्यात बटाट्याचे तुकडे घाला आणि भजी तेलात सोडून तळून घ्या.

दिवसभरात फक्त 'एवढी'च पावलं चाला, वजन कमी होणारच- हृदयही राहील निरोगी -दिसाल फिट

उपवासाची कढी

आता वाटीमध्ये राजगिऱ्याचे पीठ घ्या. त्यात वाटीभर दही, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून चमच्याने मिक्स करा. कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात चमचाभर तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर चमचाभर जिरं घाला. नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि तयार राजगिऱ्याचे बॅटर घालून चमच्याने ढवळत राहा. नंतर त्यात भजी घालून मिक्स करा. अशा प्रकारे उपवासाची चमचमीत कढी खाण्यासाठी रेडी.

Web Title: Have you ever tried Upwasachi Kadhi recipe; check out instant Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.