सायंकाळच्या चहासोबत काही न काही चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. स्नॅक्समध्ये आपण समोसा, कटलेट्स, वेफर्स, भाकरवडी असे पदार्थ खात असतो. मात्र, तेच तेच पदार्थ खाऊन कटांळा आला असेल तर, आलू रवा पुरी हा पदार्थ ट्राय करून पाहा. पुरी भाजी हा पदार्थ आपण अनेकदा खाल्ला असेल. घरात कोणतातरी सोहळा अथवा कार्यक्रम असलं की आपण पुरी भाजी करतो. मात्र, याच साहित्यात आपण आलू रवा पुरी हा पदार्थ बनवू शकता. गव्हाच्या पिठाला आणि बटाट्याला आपण नवा ट्विस्ट देऊन हटके रेसिपी ट्राय करू शकता. हिवाळ्यात सायंकाळच्या चहाची रंगत हा पदार्थ नक्की वाढवेल.
आलू रवा पुरी हा पदार्थ बनवण्यासाठी लागणारं साहित्य
गव्हाचं पिठ
बटाटे
रवा
कोथिंबीर
मिरची
रेड चिली फ्लेक्स
जिरं
पाणी
तेल
कृती
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये गरम पाणी घ्या त्यात रवा टाका. पाण्यात रवा चांगले मिक्स करा. त्यावर प्लेट झाकून १० मिनिटे बाजूला ठेवून द्या. आता त्यात उकडून स्मॅश केलेले बटाटे, कोथिंबीर, मिरची, मीठ, रेड चिली फ्लेक्स आणि जिरं टाकून सर्व मिश्रण एकत्र करा.
मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात एक गव्हाचं पीठ टाका. आणि मिश्रण चांगले मळून घ्या. पीठ चांगले मळून झाल्यानंतर तेल लावून पिठाला पुन्हा मळून घ्या. पीठ मळून झाल्यानंतर त्यावर प्लेट झाकून ५ मिनिटे ठेऊन द्या.
आता हाताला तेल लावून पीठाचे छोटे छोटे गोळे तयार करा, आणि त्याचे पुरी लाटून घ्या. एकीकडे कढईत तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर सगळ्या पुऱ्या तळून घ्या. अशा प्रकारे आलू रवा पुरी खाण्यासाठी रेडी.