Lokmat Sakhi >Food > तुम्ही कधी खाल्लेत का पाणी- पकोडे? मास्टरशेफ पंकज भादोरिया सांगतात चटपटीत रेसिपी, खाऊन तर पहा..

तुम्ही कधी खाल्लेत का पाणी- पकोडे? मास्टरशेफ पंकज भादोरिया सांगतात चटपटीत रेसिपी, खाऊन तर पहा..

Pani- pakode Recipe: पाणी पुरी तर नेहमीचीच.. आता पाणी पकोडे हा एक नवा प्रकार खाऊन बघा. दिवाळीनंतर फराळाचं सोडून काही चटपटीत खायचं असेल, तर हा पदार्थ उत्तम आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2022 05:13 PM2022-11-01T17:13:09+5:302022-11-01T17:14:03+5:30

Pani- pakode Recipe: पाणी पुरी तर नेहमीचीच.. आता पाणी पकोडे हा एक नवा प्रकार खाऊन बघा. दिवाळीनंतर फराळाचं सोडून काही चटपटीत खायचं असेल, तर हा पदार्थ उत्तम आहे.

Have you tried Pani- pakode? Special recipe of pani pakode by master chef Pankaj Bhadouria  | तुम्ही कधी खाल्लेत का पाणी- पकोडे? मास्टरशेफ पंकज भादोरिया सांगतात चटपटीत रेसिपी, खाऊन तर पहा..

तुम्ही कधी खाल्लेत का पाणी- पकोडे? मास्टरशेफ पंकज भादोरिया सांगतात चटपटीत रेसिपी, खाऊन तर पहा..

Highlightsहा आंबट- गोड- तिखट चवीचा पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडू शकतो. 

पाणीपुरी, गरमागरम भजी किंवा वडे हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. आता पाणीपुरी तर आपण नेहमीच खातो. अधून- मधून लहर आल्यावर घरी गरमागरम भजीही बऱ्याचदा तळली जातातच. आता या दोन्ही पदार्थांचं एक भन्नाट चवीचं जबरदस्त कॉम्बिनेशन कसं करता येईल, याविषयी मास्टर शेफ पंकज भादोरिया (mastercheff Pankaj Bhadouria) यांनी एक मस्त रेसिपी (pani pakode recipe) शेअर केली आहे. पाणीपुरीचं चटकदार, चटपटीत पाणी आणि त्यात टाकलेलं मऊ लुसलुशीत पकोडे.. असा हा आंबट- गोड- तिखट चवीचा पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडू शकतो. 

 

पाणी- पकोडे करण्याची रेसिपी
पकोडे तयार करण्यासाठी...

१. १ कप बेसन घ्या. त्यात चवीनुसार मीठ आणि हिंग टाका. 

२. आता थोडं थोडं पाणी टाकून बेसन भिजवून घ्या. ४ ते ५ मिनिटे पीठ चांगलं फेटून घ्या. जेणेकरून पकोडे छान फुलून येतील.

दिवाळीतला चिवडा उरला आहे, खाऊन खाऊन कंटाळलात? करा चिवड्याचे खमंग थालीपीठ.. बघा सोपी कृती

३. नंतर हे पीठ ५ ते १० मिनिटे झाकून ठेवा. त्यानंतर पुन्हा ते फेटून घ्या. त्यात पाव टीस्पून बेकींग पावडर टाकली तरी चालेल. 

४. आता कढईमध्ये तेल गरम करा आणि पकोडे तळून घ्या.

५. एका बाऊलमध्ये पाणी घ्या. तळून झालेले गरमागरम पकोडे कढईतून थेट या थंड पाण्यात टाका. ५ मिनिटे ते पाण्यात राहू द्या आणि त्यानंतर हलक्या हाताने पिळून त्यांच्यातलं पाणी काढून घ्या.

 

चटणी तयार करण्यासाठी...
३ हिरव्या मिरच्या, १ इंच अद्रकाचा तुकडा, पाव कप पुदिना, १ कप कोथिंबीर, अर्ध्या लिंबाचा रस हे साहित्य मिक्सरमधून वाटून घ्या.

एका बाऊलमध्ये ही चटणी गाळून घ्या. त्यानंतर त्यात २ कप पाणी टाका. 

दातांचा पिवळेपणा, दातदुखी, तोंडाची दुर्गंधी होईल कमी, बघा तज्ज्ञांनी सांगितलेला घरगुती उपाय

१ टेबलस्पून चिंचेचा कोळ टाका आणि ४०० मिली पेरूचा ज्यूस घाला. 

चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळं मीठ, चाट मसाला, जिरे पावडर, चिली फ्लेक्स टाका. 

आता या पाण्यात आधी तळून घेतलेले पकोडे टाका. पाणी पकोडे हा चटपटीत पदार्थ झाला तयार. 

 

Web Title: Have you tried Pani- pakode? Special recipe of pani pakode by master chef Pankaj Bhadouria 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.