Lokmat Sakhi >Food > पॉपकॉर्न सूप टेस्ट केलं का? सुप्रसिद्ध शेफ कुणाल कपूर सांगतात पॉपकॉर्न सूपची खास रेसिपी

पॉपकॉर्न सूप टेस्ट केलं का? सुप्रसिद्ध शेफ कुणाल कपूर सांगतात पॉपकॉर्न सूपची खास रेसिपी

How To Make Popcorn Soup At Home : कॉर्न सूप तर आपण नेहमी पितो पण पॉपकॉर्न सूप कधी पिऊन पाहिले आहे? घ्या रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2023 02:20 PM2023-02-06T14:20:15+5:302023-02-06T14:21:19+5:30

How To Make Popcorn Soup At Home : कॉर्न सूप तर आपण नेहमी पितो पण पॉपकॉर्न सूप कधी पिऊन पाहिले आहे? घ्या रेसिपी

Have you tried popcorn soup? Famous chef Kunal Kapoor shares a special recipe for popcorn soup | पॉपकॉर्न सूप टेस्ट केलं का? सुप्रसिद्ध शेफ कुणाल कपूर सांगतात पॉपकॉर्न सूपची खास रेसिपी

पॉपकॉर्न सूप टेस्ट केलं का? सुप्रसिद्ध शेफ कुणाल कपूर सांगतात पॉपकॉर्न सूपची खास रेसिपी

सिनेमा, नाटक पाहतानाचा आपला हक्काचा सोबती म्हणजेच पॉपकॉर्न. पॉपकॉर्न खात खात सिनेमा - नाटक पाहणे आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवडते. सिनेमा बघताना हातात पॉपकॉर्न असल्याशिवाय मज्जा नाहीच. म्हणूनच जगभरातल्या चित्रपटगृहात पॉपकॉर्नचे स्टॉल कायम असतात. सिनेमा आणि पॉपकॉर्न यांचं नातं अतूट आहे. मात्र हे पॉपकॉर्न, ज्यांच्याकडे आपण निव्वळ टाईमपास म्हणून बघतो त्यात आहाराशास्त्राच्यादृष्टीनं उत्तम गुणही लपलेले आहेत.

रक्तातील साखरेचे नियमन, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणे, पचन सुधारणे, वृध्दत्वाला दूर ठेवणे, वजन कमी करण्यास मदत करणे अशा अनेक बाबतीत पॉपकॉर्न मदत करतं. जर घरात जास्तीचे पॉपकॉर्न उरले असतील तर आपण त्यापासून मस्त, चवदार पॉपकॉर्न सूप तयार करू शकता. सुप्रसिद्ध शेफ कुणाल कपूर पॉपकॉर्न पासून सूप कसे तयार करायचे याचे साहित्य व कृती सांगत आहेत(How To Make Popcorn Soup At Home). 

साहित्य :- 

१. बटर - २ टेबलस्पून 
२. जिरे - १/४ टेबलस्पून 
३. लसूण - १/४ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
४. आलं - १/४ टेबलस्पून (बारीक चिरलेले)
५. कढीपत्ता - ६ ते ७ पान 
६. कांदा - १/४ टेबलस्पून (बारीक चिरलेला)
७. कोथिंबीरचे देट - १/२ टेबलस्पून (बारीक चिरलेले)
८. हळद - १/२ टेबलस्पून 
९. मीठ - चवीनुसार 
१०. पाणी - गरजेनुसार 
११. पॉपकॉर्न - ३ कप 
१२. फ्रेश क्रिम - १/४ टेबलस्पून 


 
सुप्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी आपल्या chefkunal या इंस्टाग्राम पेजवरून पॉपकॉर्न सूप कसे तयार करायचे याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

  

कृती :- 

१. सर्वप्रथम एका पॅनमध्ये बटर घालून घ्यावे. बटर वितळल्यानंतर त्यात जिरे, बारीक चिरून घेतलेलं आलं, लसूण, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीरचे देट घालून सगळे व्यवस्थित परतून घ्यावे. 
२. आता या मिश्रणांत गरजेनुसार पाणी, मीठ, हळद घालून घ्यावे. 
३. त्यानंतर या मिश्रणाला एक हलकीशी उकळी आल्यानंतर त्यात तयार पॉपकॉर्न घालावेत. 

४. आता गॅस मंद आचेवर ठेवून ब्लेंडरचा वापर करून हे सूप व्यवस्थित ब्लेंड करून घ्यावे. 
५. गॅस मंद आचेवर असतानाच त्यात फ्रेश क्रिम घालून घ्यावी. हे सूप व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.   
६. आता एक मोठी गाळण घेऊन हे सूप त्या गाळणीने गाळून घ्यावे. 

गाळून तयार झालेले गरम पॉपकॉर्न सूप बाऊलमध्ये सर्व्ह करून पिण्यासाठी तयार आहे.

Web Title: Have you tried popcorn soup? Famous chef Kunal Kapoor shares a special recipe for popcorn soup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.