Join us  

चुरचुरीत खमंग फोडणी पदार्थाची चव तर वाढवतेच, अजूनही 3 फायदे आहेत फोडणीच्या झणझणीत 'तडक्याचे'! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 7:09 PM

तडका फक्त चव वाढवण्यासाठीच नसतो. तडक्यात आरोग्यदायी गुणधर्मही दडलेले असतात, ज्याकडे फारसं कोणाचं लक्ष नसतं. तडक्यासाठी वापरले जाणारे घटक चव वाढवणारे असले तरी त्यांच्यामुळे आरोग्यासही अनेक लाभ होतात.

ठळक मुद्दे तुरीच्या डाळील तडका देताना त्यात लसूण आणि आलं टकलं तर तुरीची डाळ पोटास त्रासदायक ठरत नाही.जिर्‍याचा तडका दिल्यानं पचनक्रिया सुधारते.तडका देताना त्यात कढीपत्ता अवश्य घालावा. कारण यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहाते.

 वरण, कढी, रायता, चटणी, सांभार या पदार्थांना तडका दिला की त्यांची चव एकदम बदलते. वरण, चटणी , रायतं खूप चविष्ट लागतं. अर्थात तडका हा एकच शब्द असला तरी वेगवेगळ्या पदार्थांना वेगवेगळ्या पध्दतीनं तडका दिला जातो. तडका फक्त चव वाढवण्यासाठीच नसतो. तडक्यात आरोग्यदायी गुणधर्मही दडलेले असतात, ज्याकडे फारसं कोणाचं लक्ष नसतं. तडक्यासाठी वापरले जाणारे घटक चव वाढवणारे असले तरी त्यांच्यामुळे आरोग्यासही अनेक लाभ होतात.

छायाचित्र- गुगल

डाळींना हिंगाचा तडका

तुरीच्या डाळील तडका देताना त्यात लसूण आणि आलं टकलं तर तुरीची डाळ पोटास त्रासदायक ठरत नाही. तुरीच्या डाळीला तडका देताना तेला ऐवजी तूप वापरलं तर तुरीची डाळ गुणानं थंड होते. तर उडदाची डाळ असेल तर तडक्यासाठी मोहरीचं तेल वापरावं. मोहरीच्या तेलात आलं, लसूण टाकलं तर या तडक्यानं उडदाची डाळ पोटास बाधत नाही.अनेकांना तुरीची डाळ खाल्ल्यानं त्रास होतो. पोट फुगण्याचा त्रास होतो. असं होवू नये म्हणून तुरीच्या डाळीला तुपात हिंग घालून तडका द्यावा.

छायाचित्र- गुगल

तडक्याचे फायदे

1. वेगवेगळ्या डाळींचं वरण, कढी, रायता, चटणी यांना तडक्या दिल्यानं या पदार्थांचं पोषण मूल्यं वाढतं. तडक्यात प्रामुख्यानं लसूण वापरलाच जातो. लसणामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच लसणात जीवाणूविरोधी गुणधर्म असतात. यामुळे आजारांचा संसर्ग होत नाही. शिवाय सर्दी, खोकला आणि डोकेदुखी यासारख्या समस्याही दूर होतात. तडक्यसाठी हिंग, जिरे हे घटक वापरल्यानं पदार्थांचा स्वाद वाढतो तसेच पदार्थ पौष्टिकही होतो. विरघळणारी जीवनसत्त्वं शोषून घेण्यासाठी फॅटस आवश्यक असतात. हे फॅटस तडक्यासाठी तुपाचा उपयोग केल्याने मिळतात आणि पदार्थात जीवनसत्त्वं चांगली मिसळली जातात.

छायाचित्र- गुगल

2. तडका देताना जीरे, हिंग, मेथी दाणे, कढी पत्ता हे घटक वापरले जातात. या प्रत्येक घटकाचे वेगवेगळे गुणधर्म आणि फायदे आहेत. जिर्‍याचा तडका दिल्यानं पचनक्रिया सुधारते. पोटफुगी, डायरिया, अँसिडिटी, अपचन यासारखे त्रास होत नाही.

3. तडका देताना त्यात कढीपत्ता अवश्य घालावा. कारण यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहाते. तडक्यातील कढीपत्त्यामुळे पचन सुरळीत होतं, मधुमेहाचा धोका टळतो. कढी पत्त्यात फायबर, कर्बोदकं, ई,बी, अ आणि क जीवनसत्त्वं तसेच फॉस्फरस आणि कॅल्शियम हे घटक मुबलक प्रमाणात असतात. तडक्यात कढीपत्ता वापरल्यानं त्याचा शरीराला फायदा होतो.