Lokmat Sakhi >Food > प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि लोह भरपूर, त्याला म्हणतात गरिबांचा बदाम! फणसाच्या बियांचे ५ जबरदस्त फायदे

प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि लोह भरपूर, त्याला म्हणतात गरिबांचा बदाम! फणसाच्या बियांचे ५ जबरदस्त फायदे

Benefits of Jackfruit Seeds: फणसाचे गरे तर आपण नेहमीच खातो. पण गऱ्यांएवढ्याच फायदेशीर असतात फणसाच्या बिया.. म्हणूनच तर अगदी स्वस्तात प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि लोह मिळावे असे वाटत असेल तर गरिबांचा बदाम खायलाच हवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 07:45 PM2022-06-01T19:45:16+5:302022-06-01T19:50:58+5:30

Benefits of Jackfruit Seeds: फणसाचे गरे तर आपण नेहमीच खातो. पण गऱ्यांएवढ्याच फायदेशीर असतात फणसाच्या बिया.. म्हणूनच तर अगदी स्वस्तात प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि लोह मिळावे असे वाटत असेल तर गरिबांचा बदाम खायलाच हवा..

Health benefits of eating jackfruit seeds, very rich source of proteins, vitamins and iron  | प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि लोह भरपूर, त्याला म्हणतात गरिबांचा बदाम! फणसाच्या बियांचे ५ जबरदस्त फायदे

प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि लोह भरपूर, त्याला म्हणतात गरिबांचा बदाम! फणसाच्या बियांचे ५ जबरदस्त फायदे

Highlightsआपण 'वेस्ट' म्हणून टाकून दिलेल्या बिया आरोग्यासाठी अतिशय 'बेस्ट' असतात. म्हणून तर त्याला गरिबांचा बदाम म्हणतात.

फणसाचा सिझन खूप कमी काळापुरता असतो. पण त्याचा पुरेपूर उपयोग आपले आरोग्य सुधारण्यासाठी करता येतो. फक्त त्यासाठी आपल्याला या फळाची आणि ते खाण्याची योग्य पद्धत माहिती असावी लागते. फणस (jackfruit) चिरल्यानंतर त्यातले गोड गोड गरे आपण अगदी आवडीने खातो आणि बिया मात्र फेकून देतो. पण आपण 'वेस्ट' म्हणून टाकून दिलेल्या बिया आरोग्यासाठी अतिशय 'बेस्ट' असतात. शरीरासाठी त्याचे भरपूर फायदे आहेत. म्हणून तर त्याला गरिबांचा बदाम म्हणतात. या बिया (benefits of eating jackfruit seeds) खाण्याची योग्य पद्धत कोणती आणि त्याचे नेमके फायदे काय, याविषयीची माहिती सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. 

 

आपल्याला माहितीच आहे की फणस अतिशय चिकट असते. त्यामुळे गरे खाल्ल्यानंतर त्याच्या बियांनाही एक प्रकारचा चिकटपणा जाणवतो. हा चिकटपणा कमी व्हावा यासाठी या बिया स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर लगेचच पुसून घ्या आणि सावलीमध्ये वाळत टाका. एक- दोन दिवस सावलीत बिया वाळून कोरड्या झाल्या की त्यानंतर त्या पुढील पद्धतीने खाता येतील. 

 

कशा खायच्या फणसाच्या बिया?
१. फणस बिया तुम्ही रोस्ट करून खाऊ शकता. यासाठी सगळ्यात आधी कढई गॅसवर तापत ठेवा. कढई तापल्यानंतर त्यात थोडेसे तूप आणि मीठ टाका. यानंतर त्यात बिया टाका आणि छानपैकी भाजून घ्या. बिया क्रिस्पी झाल्या की भाजणे थांबवावे. अशा क्रिस्पी, कुरकुरीत बिया खाण्यासाठी चवदार लागतात.
२. फणस बिया उकळूनही खाता येतात. यासाठी एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा. या पाण्यात मीठ टाका. 
त्यात फणसाच्या बिया टाकून १५ ते २० मिनिटे उकळून घ्या. त्यानंतर बिया पाण्यातून बाहेर काढा आणि थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर त्याचं वरचं आवरण काढा. त्याच्या आतला जो मऊसर भाग असतो, तो तसाच खा किंवा भाज्यांमध्ये टाकून खा. संध्याकाळी ४ वाजता चहासोबत खाण्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे. 

 

फणसाच्या बिया खाण्याचे फायदे
- एखादा महागडा सुकामेवा खाऊन तुमच्या आरोग्याला जेवढे फायदे होऊ शकतील, तेवढेच फायदे या बियांमधून मिळतात. त्यामुळेच तर त्याला गरिबांचा बदाम म्हणतात.
- प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी काय खावं, हा विचार करत असाल, तर फणस बिया हा त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय होऊ शकतो.
- अनेक जणांना व्हिटॅमिन बी ६, बी १२ ची कमतरता (difficiency of vitamin B6, B12) जाणवते. ही कमतरता भरून काढण्यासाठी फणस बी खा. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी असते.
- लोह देखील फणस बी मध्ये पुरेपूर प्रमाणात असते. त्यामुळे ॲनिमियाचा त्रास असणाऱ्यांनी फणस बी खावे.
- फायबर देखील भरपूर असते. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. पचनाचे विकार दूर होतात. पचनाच्या समस्या दूर झाल्याने आपोआपच त्वचेचे आणि केसांचेही आरोग्य सुधारते. तसेच वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. 


 
 

Web Title: Health benefits of eating jackfruit seeds, very rich source of proteins, vitamins and iron 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.